शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरकार, कारखानदारांवर संघटित दबाव हवा, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:38 IST

दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली.

समडोळी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने केली. यात काही प्रमाणात यश आले असले तरी निश्चित ऊसदर, हमीभाव, एफआरपी रक्कम, थकीत बिले, पहिली उचल व काटमारीसह अन्य समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, साखर कारखानदारांवर संघटितपणे दबाव आणणे अपरिहार्य बनले आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.समडोळी (ता. मिरज) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सुभाष मगदूम, माणिक खोत, कासीम मुजावर, पायगोडा ढोले, प्रा. बी. एस चव्हाण, संदीप आडमुठे, पोपटराव मोरे प्रमुख उपस्थित होते.शेट्टी म्हणाले की, गतवर्षी राज्यात १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन निघाले. यातही दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली. याबाबत साखर कारखानदारांना जाब विचारावा लागेल. यामुळे संघटनेच्या पाठीशी राहूनच आपण आपला न्याय हक्क पदरात पाडून घ्यावा.युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आम्ही आजवर ताकद देण्याचे काम केले आहे. नेते मंडळींनीदेखील आम्हाला वाऱ्यावर सोडू नये असे मत मांडले.महेश खराडे म्हणाले, ऊस दरामध्ये खोडा घालण्याचे काम राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्यांनी केले आहे. शेतकरी हितापेक्षा सुडाचे राजकारण हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीतही कारखान्यास चांगला दर देण्यास आम्ही भाग पडू.यावेळी पोपटराव मोरे, प्रा. बी. एस. चव्हाण, प्रफुल्ल मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. महावीर बिरनाळे यांनी आभार मानले.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार