शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी, चंद्रहार पाटील यांची मागणी; आझाद मैदानात उपोषणाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 20:20 IST

वर्षभरात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. त्यामुळे कुस्ती विश्वात संभ्रमाचे वातावरण

विटा : राज्यातील सर्वोच्च मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत आता वाद निर्माण झाला आहे. १९६० पासून एकमेव सर्वोच्च स्पर्धा म्हणून महाराष्ट्र केसरी स्वीकारली जात होती. मात्र, आता संघटनेमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षभरात तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. त्यामुळे कुस्ती विश्वात संभ्रमाचे वातावरण असून, कुस्तीगिरांची हेळसांड होत आहे. या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शासनाकडे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, अशी मागणी केली असून, तोडगा न निघाल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी किताबासाठी अनेक स्पर्धा झाल्यामुळे खरा महाराष्ट्र केसरी कोण हेच लोकांना उमगत नाही. त्यामुळे या किताबाची प्रतिष्ठा व किंमत कमी होत आहे. गेल्या वर्षी निवडणुकीमुळे २०२४ मधील स्पर्धा पुढे ढकलल्या. परिणामी २०२५ मध्ये दोन स्पर्धा झाल्या. यंदा नोव्हेंबरमध्ये पुन्हा दोन स्पर्धा होणार आहेत. आणखी एका संघटनेचाही उदय झाल्याचे समजते. अशा परिस्थितीत एका वर्षात पाच महाराष्ट्र केसरी तयार होत असून, हा प्रकार राज्यातील कुस्ती परंपरेला धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळे शासनाने या स्थितीवर तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.आंदोलनाचा पावित्राचंद्रहार पाटील यांनी यापूर्वी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले होते, तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मागणी केली होती. मात्र, अजून कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी आता निर्णायक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

आमचा कोणत्याही कुस्तीगीर संघटनेला विरोध नाही. मात्र, दरवर्षी फक्त एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, हीच आमची एकमेव मागणी आहे. - पै. चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी, विटा