शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदराची कोंडी फुटल्याशिवाय ऊसतोड नाही,  रविवारी गाव बंद; नांद्रेतील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 11:56 IST

सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय ऊसतोडी घ्यायच्या नाहीत, असा निर्णय नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्वच शेतकरी संघटनांच्या ऊस दर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय गाव बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देसर्व संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थितीवाद बाजूला ठेवून आंदोलन, अन्य संघटनांचेही प्रतिनिधी उपस्थित मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांमध्ये ऊस दराबाबत जनजागृती

सांगली ,दि. ०४ :  जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय ऊसतोडी घ्यायच्या नाहीत, असा निर्णय नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्वच शेतकरी संघटनांच्या ऊस दर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय गाव बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला.

नांद्रे येथे शेतकऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील, रावसाहेब ऐतवडे, सुभाष पाटील, मनोज पाटील, रावसाहेब पाटील उपस्थित होते.

या बैठकीत शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात तीव्र शब्दात मते व्यक्त केली. शेतीचा उत्पादन खर्च वाढला असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेत नाही. साखर कारखानदारांना पोषक अशीच धोरणे राबवून शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. जोपर्यंत सरकार आणि साखर कारखानदार ऊस दराची कोंडी फोडणार नाहीत, तोपर्यंत ऊसतोडी न घेण्याचा निर्णय सर्व शेतकऱ्यांनी घेतला.

सर्व संघटनांनी ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी नांद्रे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच रविवारी नांद्रेसह परिसरातील गावांमध्ये मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांमध्ये ऊस दराबाबत जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीमध्ये शुक्रवारी घेण्यात आला.

वाद बाजूला ठेवून आंदोलन

नांद्रे येथील शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांचेही प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी, संघटनांचे वाद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनाचा लढा पुकारण्याची विनंती केली. जो शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेईल, त्यांना शेतकऱ्यांचे यापुढे सहकार्य मिळणार नाही, अशा भावना शेतकऱ्यांनी भाषणात व्यक्त केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली