आटपाडीत शिंदे हॉस्पिटलवर छापा-सोनोग्राफीचे रेकॉर्ड नाही

By Admin | Updated: August 31, 2014 23:59 IST2014-08-31T22:40:06+5:302014-08-31T23:59:08+5:30

रेकॉर्डमध्ये त्रुटी : कारणे दाखवा नोटीस; आणखी रुग्णालयांची तपासणी सुरू

There is no record of sonography and raid on Shinde Hospital at Atpadi | आटपाडीत शिंदे हॉस्पिटलवर छापा-सोनोग्राफीचे रेकॉर्ड नाही

आटपाडीत शिंदे हॉस्पिटलवर छापा-सोनोग्राफीचे रेकॉर्ड नाही

सांगली : आटपाडी येथील डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या शिंदे मॅटर्निटी हॉस्पिटलवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. टी. सांगळे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात सोनोग्राफी यंत्रात त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. यामुळे त्यांना तुमच्यावर कारवाई का करु नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या चार दिवसात जिल्ह्यातील आणखी काही मॅटर्निटी हॉस्पिटलवर छापा टाकून रेकॉर्डची तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. सांगळे यांनी सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी सांगलीतील आंबेडकर रस्त्यावरील श्री मॅटर्निटी हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकला होता. या छाप्यात डॉ. सुषमा पाटील यांनी बेकायदा १०७ महिलांचे गर्भपात केल्याचे आढळून आले होते. या कारवाईने खळबळ उडाली होती. जिल्ह्यात अनेक मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार सुरु असून, रेकॉर्ड अपडेट नसल्याची माहिती मिळाली होती. यामुळे डॉ. सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बसाप्पा कोळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. सरगर यांच्या पथकाने आटपाडीतील शिंदे हॉस्पिटलवर तपासणी वैद्यकीय पथकाने अचानक छापा टाकला. तेथील रेकॉर्डची विशेषत: सोनोग्राफी यंत्राची तपासणी केली. (प्रतिनिधी)

सोनोग्राफीचे रेकॉर्ड नाही
हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. प्रतिभा शिंदे यांनी एप्रिल २०१४ पासून सोनोग्राफीचे रेकॉर्ड अपडेट ठेवले नसल्याचे आढळून आले. प्रत्येक गर्भवती महिलेची सोनोग्राफी तपासणी केल्यानंतर त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. मात्र तसे त्यांनी केले नसल्याचे दिसून आले.

Web Title: There is no record of sonography and raid on Shinde Hospital at Atpadi