तीनशे ग्रामपंचायतींचे ‘आॅडिट’ नाही

By Admin | Updated: October 3, 2015 23:47 IST2015-10-03T23:47:46+5:302015-10-03T23:47:46+5:30

सतरा हजार त्रुटी : लाखोंच्या घोटाळ्यांकडे ग्रामसेवकांचे दुर्लक्ष

There is no 'audit' of three hundred Gram Panchayats | तीनशे ग्रामपंचायतींचे ‘आॅडिट’ नाही

तीनशे ग्रामपंचायतींचे ‘आॅडिट’ नाही

सांगली : जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायती असून, त्यापैकी तीनशे ग्रामपंचायतींचे पाच वर्षात लेखापरीक्षणच झालेले नाही. लेखापरीक्षण झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा असल्याचे उघडकीस आले आहे. तेथे अपहार, साहित्य खरेदीच्या पावत्यांतील तफावत आणि अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. याबद्दल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही ग्रामसेवकांकडून लेखापरीक्षणातील १७ हजार ४०२ त्रुटींकडे दुर्लक्ष होत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना थेट कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत आहे. या निधीतून ग्रामपंचायती विकासकामे राबवत आहेत. काही ग्रामपंचायतींकडून निधीचा गैरवापर होत आहे. त्यामुळे दरवर्षी ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण झाले पाहिजे, अशी मागणी आहे. मात्र जिल्ह्यातील तीनशे ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षणच झालेले नाही. यामुळे ग्रामपंचायतीमधील लाखो रुपयांचा घोटाळा उजेडातच येत नसल्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. उर्वरित ४०४ ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण झाले आहे. मात्र तेथील निधी खर्चातील अनियमितता यासह विविध गैरकारभाराच्या १७ हजार ४०२ त्रुटी लेखा परीक्षकांनी काढल्या आहेत. या त्रुटी दूर करण्याच्यादृष्टीने ग्रामपंचायतीकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. यामुळे वर्षानुवर्षे त्या त्रुटी तशाच राहिल्या आहेत.
आक्षेपांची संख्या
तालुका आक्षेप
आटपाडी ६६
जत ३५८६
कडेगाव २८४८
क़महांकाळ १२५५
खानापूर ११७१
मिरज ३४१३
पलूस ७४४
शिराळा १६२३
तासगाव १२०७
वाळवा १४८९
एकूण १७४०२

 

Web Title: There is no 'audit' of three hundred Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.