विषमुक्त जीवनासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:55+5:302021-02-05T07:27:55+5:30
काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, बाजारात कमी खर्चात जादा पैसे मिळविण्याच्या मोहापायी माणूस माणसाच्या जिवावर उठला आहे. विषारी घटकांचा वापर करून ...

विषमुक्त जीवनासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही
काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, बाजारात कमी खर्चात जादा पैसे मिळविण्याच्या मोहापायी माणूस माणसाच्या जिवावर उठला आहे. विषारी घटकांचा वापर करून अनेक खाद्यपदार्थ तयार करण्याचे उद्योगधंदे सुरू आहेत. त्यात गूळ व्यवसायही कमी नाही. गूळ सुंदर, आकर्षक दिसण्यासाठी व गोडवा येण्यासाठी अनेक नको असलेले घटक काही व्यावसायिक वापरत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि म्हणूनच सर्वांनी सेंद्रिय गुळाचा वापर करणे गरजेचे आहे. शिगावातील महिला व पुरुष यांनी मिळून उभ्या केलेल्या या उद्योग व्यवसायाचा फायदा ग्राहक व शेतकऱ्यांना नक्कीच होईल.
सरपंच उत्तम गावडे म्हणाले, या गुऱ्हाळामध्ये येणाऱ्या उसाला साखर कारखान्याप्रमाणे दर दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना स्वतःचे गूळ उत्पादन करायचे असेल, तर तशीही सोय येथे केली आहे.
यावेळी शोभा पाटील, शीतल गावडे, बाळाबाई मदने, सुचित्रा पाटील, राणी गावडे, रूपाली पाटील आदी उपस्थित होते.
फोटो२५शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथे मल्टिजागस्टार गूळघराचे उद्घाटन काडसिद्धेश्वर महाराज यांच्याहस्ते झाले.