अठरा लाखांचे साहित्य गोदामात

By Admin | Updated: June 17, 2014 00:45 IST2014-06-17T00:41:21+5:302014-06-17T00:45:27+5:30

चौकशीत अनेक त्रुटी : कृषी विभागाच्या खातेप्रमुखांनी पाहणी न केल्याचे स्पष्ट

There is a library of eighteen lakh godowns | अठरा लाखांचे साहित्य गोदामात

अठरा लाखांचे साहित्य गोदामात

 सांगली : कृषी विभागाच्या दहा पंचायत समित्यांच्या ठिकाणी असलेल्या गोदामांमध्ये १८ लाख ४५ हजारांचे जुने साहित्य आढळून आले आहे. पूर्वीचे जुने साहित्य शिल्लक असताना अधिकाऱ्यांकडून पुन्हा खरेदी झाली आहे. खातेप्रमुखांनी गोदामांना भेटी देऊन साहित्याची पाहणी केली नसल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. या सर्व त्रुटीचा अहवाल मुख्य वित्त अधिकारी मंगळवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडील विविध योजनांतून मागासवर्गीय आणि अन्य शेतकऱ्यांना शेती अवजारे, अभियांत्रिकी योजनेतून विद्युत मोटारी, पाईपचे वाटप करण्यात येते. याशिवाय स्वीय निधीतूनही लाखो रुपयांची अवजारे खरेदी केली जातात. मात्र येथील साहित्यांचे शेतकऱ्यांना वाटप न झाल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी मुख्य वित्त अधिकारी शुभांगी पाटोळे यांना पथके तयार करून कृषी गोदामांच्या तपासणीची सूचना दिली होती. पाटोळे यांनी दहा पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या गोदामांची पथकांमार्फत तपासणी पूर्ण केली आहे. यामध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. दहा गोदामांमध्ये २०११-१२ आणि २०१३ या वर्षात खरेदी केलेले साहित्य आढळून आले आहे. यामध्ये स्प्रे-पंप ८८३ नग असून, त्याची किंमत ६ लाख ७० हजार २७५ रुपये आहे. पॉवर स्प्रे-पंप ६ नग असून, किंमत १३ हजार ९९८, पहार १७० नग- किंमत २६ हजार ६५०, पाटीवरील पंप ८७ - किंमत ५५ हजार ७१ रुपये, सौरकंदील ३०- त्याची किंमत ३७ हजार ५७५ रुपये आहे. घरगुती दिवे १४ असून, ७० हजार ७०० रुपये किंमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व साहित्याची लाभार्थी हिश्श्यासह १८ लाख ४५ हजार रुपये किंमत आहे. एवढे साहित्य दोन ते तीन वर्षापासून गोदामात पडून आहे. याबरोबरच स्प्रे-पंप ८८३ शिल्लक असताना नव्याने २०१३-१४ मध्ये ६३१ पंपांची खरेदी झाली आहे. या सर्व प्रकरणांकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: There is a library of eighteen lakh godowns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.