शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

भाजपमध्ये भांडण नाही, आमच्यात बिबा घालू नका - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:56 IST

पक्षाचा विस्तार काहींना बघवत नाही

सांगली : राज्यात भाजप हा सर्वात वेगाने वाढणारा आणि क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यामुळे काहींना हे बघवत नाही. सांगलीतच नव्हे तर पुण्यातसुद्धा दररोज काहीतरी उठाठेव सुरू असते. सांगलीसारख्या ठिकाणी आमच्यात बिबा घालण्याचा अशक्य प्रयत्न झाला; मात्र आमच्यात कोणतेही भांडण नाही. महापालिका निवडणुकीत कोणावरही अन्याय होणार नाही, असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षांतर्गत वादावर पडदा टाकला.भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनी निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांवरील अन्यायाविरोधात थेट पालकमंत्र्यांवर निशाणा साधला होता. शुक्रवारी (दि. ३१) जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमधील अंतर्गत वादाच्या चर्चांवर भाष्य केले.ते म्हणाले की, ‘महापालिका निवडणुकीतील उमेदवारीबाबत सुधीर गाडगीळ यांना स्पष्टता दिली आहे. आमच्यात कोणतेही भांडण नाही. तुम्ही भांडू नका म्हणून सर्वसामान्य लोक अस्वस्थ आहेत; पण आमचा पक्ष संघटित आहे. जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, वैभव पाटील, अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी मूळ पक्षसंघटनेची ताकद कायम आहे.सांगली महापालिकेत भाजपच्या ४३ जागा निवडून आल्या. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. कोल्हापुरात ताराराणी आघाडीसह ३३ जागा आहेत आणि तिथेही तडजोड होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. घटक पक्ष व भाजपसोबत येणाऱ्या पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांचा सर्व्हे करून उमेदवारी निश्चित ठरवू.सांगलीत निवडणूक होऊन सात वर्षे झाली असून, या काळात विद्यमान नगरसेवक अध्यक्ष चांगले लोक तयार झाले आहेत. त्यांचाही विचार केला जाईल. आरक्षण सोडत झाल्यानंतर आठ-दहा दिवसांत पक्षाचा सर्वे होईल. जयश्री पाटील यांच्या २२ नगरसेवकांपैकी सहाजण भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपचे ४३ व जयश्री वहिनींचे ६ अशी मिळून ४९ जागा निश्चित आहेत. याशिवाय राष्ट्रवादी अजित दादा गटासोबत किती नगरसेवक आहेत हे बघावे लागेल. जनसुराज्यनेही काही जागांची मागणी केली आहे, मात्र भाजपच्या कोणावरही अन्याय होणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

पक्ष मेरिटवर चालतोमहापालिका जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी अनेक संधी निर्माण होतात. स्वीकृत नगरसेवक, शिक्षण मंडळ, परिवहन, वृक्ष समिती तसेच विविध महामंडळांमध्ये संधी उपलब्ध होतील. आमचा पक्ष मेरिटवर चालतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : No infighting in BJP, don't create rifts: Chandrakant Patil

Web Summary : Chandrakant Patil denies BJP infighting in Sangli, assures no injustice in corporation elections. He emphasizes party unity despite new entrants, aims for 43 corporation seats, and promises consideration for existing corporators. Merit will be key for opportunities.