शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात शासनाच्या सात विभागांत लाचखोरीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 12:40 IST

साडेपाच वर्षांतील चित्र; ‘घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचाही फायदा’ तत्त्व अमलात

घनशाम नवाथेसांगली : शासनाच्या अनेक विभागांत टेबलाखालून आणि टेबलावरूनही लाच घेतली जाते. परंतु, असेही काही विभाग आहेत तेथे गेल्या साडेपाच वर्षांत लाचखोरीच झाली नाही. सहकार, आरटीओ, जीवन प्राधिकरण, रजिस्ट्रार, अपंग व वित्त महामंडळ, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खाते येथे लाचखोरीची तक्रारच नसल्यामुळे आश्चर्यच व्यक्त होत आहे.‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’ हे राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ब्रीदवाक्य आहे. तुमच्या हक्कासाठी लाच का? असा सवाल करत हा विभाग लाचखोरांना पकडून देण्याचे सातत्याने आवाहन करत असतो. शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याला सापळ्यात पकडून देता येते. तसेच लोकसेवकाने बेहिशोबी मालमत्ता गोळा केली असल्यास त्याचे पुरावे देऊनही कारवाई करता येते. लाचखोरीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक, मोबाइल ॲप, वेबसाइटवर तक्रार नोंदवता येते. तसेच थेट भेटूनही तक्रार करता येते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर लाचेची मागणी केली आहे काय? याची प्रथम पडताळणी केली जाते. पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यास सापळा रचून लाचखोरांना पकडण्याची कारवाई केली जाते. लाचलुचपत विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत महसूल विभागात सर्वाधिक लाचखोरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या खालोखाल पोलिस दल, जिल्हा परिषद आदी विभागांत लाचखोरांवर कारवाई होते.सांगली जिल्ह्यात शासनाच्या वेगवेगळ्या ३१ विभागांची यादी बनवली आहे. यातील सहकार, आरटीओ, जीवन प्राधिकरण, रजिस्ट्रार, अपंग व वित्त महामंडळ, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खाते या सात विभागांत २०१९ पासून लाचखोरीची कारवाईच झालेली नाही. ही माहिती वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. परंतु, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात हे चित्र दिसते. सहकार, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम, कृषी खाते, जीवन प्राधिकरण हे महत्त्वाचे विभाग आहेत. येथे नागरिकांचा कामानिमित्त थेट संबंध येतो. परंतु, ‘घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचा फायदा’ या तत्त्वामुळे लाचखोरीची तक्रारच गेल्या साडेपाच वर्षांत तरी झालेली दिसून येत नाही. एकप्रकारे ही आश्चर्याची बाबच म्हणावी लागेल.

येथे तक्रार करा कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास मोबाइल क्रमांक ९८२१८८०७३७ या क्रमांकावर तसेच टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२३३-२३७३०९५ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणGovernmentसरकार