शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक ब्रदर्स डे: कुठे संघर्षाचा वारा, तर कुठे भाईचारा; सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आमदारांच्या बंधुत्वाचे नाते बळकट

By अविनाश कोळी | Updated: May 24, 2025 16:20 IST

पडद्यामागे राहून भावाच्या यशाकरीता योगदान

अविनाश कोळीसांगली : घर सामान्य माणसाचे असो वा राजकीय नेत्याचे, बंधुत्वाचे रंग सर्वत्र सारखेच दिसतात. कधी प्रेमाचे भांडण, कधी मायेचा ओलावा. कधी आधारवड, तर कधी त्यागाचे पाऊल टाकत नात्याचा हा प्रवास अखंड सुरू असतो. बदलत्या सामाजिक परिस्थितीत भाऊबंदकीचा राक्षस मोठा होत असला, तरी बंधुत्वाच्या अवकाशापुढे तो खुजाच ठरतो. जिल्ह्यातील राजकारण्यांचे विश्व बंधूप्रेमाच्या कहाण्यांनी व्यापले आहे. अपवादात्मक ठिकाणी संघर्षाचे काटे दिसून येताहेत.उद्योग, व्यावसाय, सहकारी संस्था, शेती असे भक्कम आर्थिक स्रोत निर्माण केल्याने अनेक नेत्यांनी राजकारणात पाय घट्ट रोवले आहेत. संस्था, उद्योगाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या त्यांच्या बंधुंमुळे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांना राजकारणात घट्ट पाय रोवून उभे राहता आले. त्यांच्या राजकारणातल्या यशामागे बंधूंचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. राष्ट्रीय बंधू दिवसानिमित्त आमदारांच्या बंधुप्रेमावर टाकलेला हा प्रकाशझोत..

जयंत पाटील यांचा बंधुभावराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व त्यांचे थोरले बंधू भगतसिंह पाटील यांच्यात कमालीचा प्रेमभाव दिसून येतो. शैक्षणिक व सहकारी संस्थांचा भार भगतसिंह सांभाळत आहेत. राजकीय पदांवर त्यांनी कधीही दावेदारी केली नाही.

सुरेश खाडे यांचे ‘दास’प्रेममाजी पालकमंत्री व मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना अशोक व दत्तात्रय असे दोन मोठे भाऊ होते. दत्तात्रय यांचे निधन झाले असून, आता दोघे भाऊ एकत्र असतात. तिन्ही भावांच्या अद्याक्षरानुसार त्यांनी ‘दास’ नावाची संस्था स्थापन केली. यावरून भावांमधील प्रेमाचे भावविश्व दिसून येते.

सुहास बाबर यांना अमोल साथखानापूर मतदारसंघाचे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांना त्यांचे मोठे भाऊ अमोल बाबर यांची साथ आहे. राजकीय कार्यकर्त्यांचा संच, जनसंपर्क, तसेच संस्थात्मक स्तरावरची सर्व जबाबदारी अमोल बाबर सांभाळतात.

गोपीचंद-ब्रम्हानंद जोडीजतचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे मोठे बंधू ब्रम्हानंद दोघेही राजकारणात सक्रीय आहेत. जिल्हा परिषदेत सभापती म्हणून ब्रम्हानंद यांनी काम केले. गोपीचंद यांच्या कार्यकर्त्यांचा संच सांभाळण्याचे कामही तेच करतात.

गाडगीळ बंधुंनी जपला भाईचारासांगलीतील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे लहान बंधू गणेश गाडगीळ यांनी नेहमीच संस्थात्मक जबाबदारी सांभाळत भावाला राजकारणात साथ दिली. दोन्ही भावांमध्ये चांगला समन्वय दिसून येतो.

खासदारांना भावाची साथवसंतदादांचे नातू खासदार विशाल पाटील यांना त्यांचे मोठे बंधू प्रतीक पाटील यांची साथ आहे. दिवंगत खासदार प्रकाशबापू पाटील यांच्या पश्चात राजकीय वारसा प्रतीक यांना लाभला होता. त्यांनी केंद्रीय राज्य मंत्रीपदापर्यंत मजल मारली. पण, अचानक कनिष्ठ बंधू विशाल यांच्यासाठी ते राजकारणापासून दूर झाले. निवडणुकांच्या काळात पडद्यामागची सर्व सुत्रे प्रतीक पाटील सांभाळत असतात.

नायकवडी बंधुंमध्ये संघर्षमिरजेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे मोठे बंधू माजी नगरसेवक अय्याज नायकवडी पूर्वीपासून काँग्रेसमध्ये आहेत. दोघांमध्ये सतत राजकीय संघर्ष दिसून आला. राजकारणात प्रदीर्घ काळापासून त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत.

थोरल्या भावांचा त्याग, धाकट्यांकडे नेतृत्वखासदार विशाल पाटील यांच्यासह जयंत पाटील, सुरेश खाडे, सुहास बाबर, गोपीचंद पडळकर, इद्रिस नायकवडी हे सारे आमदार घरात धाकटे आहेत. यातील खासदार व चार आमदारांच्या थोरल्या बंधूंनी पडद्यामागे राहण्याचा निर्णय घेतल्याने धाकट्यांकडे नेतृत्व आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलvishal patilविशाल पाटीलGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSudhir Gadgilसुधीर गाडगीळ