शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: शिराळा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:26 IST

अजित पवार गट आगामी विधानसभेला नव्याने आगमन करणार

अशोक पाटीलइस्लामपूर : शिराळाविधानसभा मतदारसंघात विविध गटांचे स्वयंभू नेते आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. ऐन विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्याच अस्तित्त्वाचा प्रश्न उभा ठाकतो. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची एन्ट्री इस्लामपूर - शिराळा मतदारसंघाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभेला मतदारसंघात भूकंप होण्याची शक्यता आहे.इस्लामपूर - शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. शिराळा तालुक्यात याच पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक यांचा वरचष्मा आहे. शिराळा मतदारसंघातील ४८ गावात जयंत पाटील यांच्या समर्थकांची फळी मोठी आहे. मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव नाईक गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात सामील झाला. त्यामुळे सध्यातरी मानसिंगराव नाईक यांचे पारडे जड आहे. परंतु, ऐन विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.शिराळ्यातील डोंगरी भागात प्रत्येकाचा गट असल्याचा दावा केला जातो. विशेषत: भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य सत्यजीत देशमुख यांच्या गटाचे वर्चस्व डोंगरी भागात आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत आमदार होण्यासाठी त्यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत. वाळवा तालुक्यातील शिराळा मतदारसंघात असलेल्या ४८ गावांतील उगवते नेतृत्व सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये आमदार होण्याचा पक्का विचार केला आहे. या दोघांना एकत्रित करण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.शिराळा मतदारसंघात उद्योग वाढले नाहीत. त्यामुळेच येथील मतदार मुंबई येथे नोकरीसाठी गेले. यांच्यासाठी मतदारसंघात रोजगार मिळावा म्हणून मानसिंगराव नाईक यांनी शिराळ्यात उद्योग क्षेत्रात क्रांती करण्याचा डाव आखला. हेच ओळखून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिराळा मतदारसंघात साखर उद्योगाच्या नावाखाली राजकीय एन्ट्री करण्याची खेळी केली आहे. आता मतदारसंघात नवीन पवार गटाचा उदय झाल्यास आगामी विधानसभेला नेहमीप्रमाणे राजकीय भूकंपाची परंपरा कायम राहील.

शिराळा मतदारसंघात पारंपरिक लढती नेहमीच असतात. सध्यातरी आमची भूमिका शरदचंद्र पवार यांच्याबरोबरच ठाम आहे. येणाऱ्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या भूमिकेवरच आगामी विधानसभेची लढत ठरेल. - रणधीर नाईक, माजी जि. प. सदस्य

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणshirala-acशिराळाvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार