सहा तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:55+5:302021-02-05T07:29:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा व वाळवा या सहा तालुक्यांत सोमवारी दिवसभरात एकही ...

सहा तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा व वाळवा या सहा तालुक्यांत सोमवारी दिवसभरात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. उर्वरित तालुक्यातील ८ जणांना कोरोनाची बाधा झाली तर दिवसभरात २४ जणांनी कोरोनावर मात केली. उपचाराखालील ३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या एकूण ११४ रुग्ण उपचाराखाली आहेत.
महापालिका क्षेत्रात सोमवारी सांगलीत दोन, तर मिरजेत एका रुग्णाची नोंद झाली. पलूस, खानापूर व तासगाव तालुक्यात प्रत्येकी एक, तर जत तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या ५६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात तीन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या ६७५ चाचण्यांत ६ रुग्ण सापडले. सध्या ३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर २८, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर २, तर नाॅन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ५ रुग्ण आहेत. सातारा जिल्ह्यातील एक रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाला आहे. सध्या परजिल्ह्यांतील ८ रुग्ण उपचाराखाली आहेत.