पाच तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:42+5:302021-01-20T04:27:42+5:30

सांगली : जिल्ह्यातील पलूस, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा व वाळवा या पाच तालुक्यांत मंगळवारी दिवसभरात एकही कोरोना रुग्ण आढळून ...

There are no corona patients in five talukas | पाच तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण नाही

पाच तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण नाही

सांगली : जिल्ह्यातील पलूस, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा व वाळवा या पाच तालुक्यांत मंगळवारी दिवसभरात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. उर्वरित तालुक्यातील १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. दिवसभरात १० जणांनी कोरोनावर मात केली. उपचाराखालील ४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

महापालिका क्षेत्रात मंग‌ळवारी सांगलीत एक, तर मिरजेत दोन रुग्णांची नोंद झाली. आटपाडी, खानापूर व जत तालुक्यात प्रत्येकी एक, तर कडेगाव व तासगाव तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले. मिरज, वाळवा, शिराळा, कवठेमहांकाळ व पलूस या पाच तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या १९८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात तीन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या ७४६ चाचण्यांत ९ रुग्ण सापडले. सध्या ४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर २७, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ३, तर नाॅन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर १० रुग्ण आहेत. कर्नाटक व सोलापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाला आहे. सध्या परजिल्ह्यांतील १५ रुग्ण उपचाराखाली आहेत.

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

आजचे रुग्ण : १०

उपचाराखालील रुग्ण : १८६

आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४६०१२

मृत्यू : १७४५

आजअखेरचे एकूण रुग्ण : ४७,९४३

चिंताजनक : ४०

चौकट

रुग्णसंख्या अशी

सांगली : १

मिरज : २

आटपाडी : १

कडेगाव : २

खानापूर : १

पलूस : ०

तासगाव : २

जत : १

कवठेमहांकाळ : ०

मिरज : ०

शिराळा : ०

वाळवा : ०

Web Title: There are no corona patients in five talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.