...तर महाराष्ट्रात ऑलिम्पिक विजेते मल्ल घडतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:18+5:302021-09-04T04:32:18+5:30
फोटो : कडेपूर (ता. कडेगाव) येथे पैलवान विक्रम माळी यांचा संग्राम देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी धनंजय देशमुख, मारुती ...

...तर महाराष्ट्रात ऑलिम्पिक विजेते मल्ल घडतील
फोटो : कडेपूर (ता. कडेगाव) येथे पैलवान विक्रम माळी यांचा संग्राम देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी धनंजय देशमुख, मारुती माळी, नामदेव यादव उपस्थित होते.
कडेगाव : ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र त्याकरिता या मल्लांनी अधिकाधिक सराव केला पाहिजे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे. क्रीडा व संघटना, शासन, समाजाने एकत्रित प्रयत्न केले, तर आपल्या खेळाडूंसाठी ऑलिंपिक पदक दूर राहणार नाही, असे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.
कडेगाव येथील पैलवान विक्रम माळी यांची उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी ७९ किलो वजनी गटात सांगली जिल्ह्यातून निवड झाली. या निवडीबद्दल कडेपूर येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शूटिंग बाॅल खेळाचे राष्ट्रीय संघटक संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते विक्रम माळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संग्रामसिंह देशमुख बोलत होते.
ते म्हणाले, महाराष्ट्राच्या मल्लांकडे चमक दाखविण्याची निश्चितपणे क्षमता आहे; मात्र त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यांनी अल्प यशावर समाधान न मानता अधिकाधिक यश मिळविण्यावर भर दिला पाहिजे.
यावेळी कडेगाव तालुका भाजप अध्यक्ष धनंजय देशमुख, मारुती माळी, नामदेव यादव, वसंत शिंदे, सुरेश माळी, ओंकार देशमुख, लक्ष्मण माळी उपस्थित होते.