...तर महावितरण कार्यालयाबाहेरच रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:32+5:302021-07-04T04:18:32+5:30
तुकाराम बाबा महाराज यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत ...

...तर महावितरण कार्यालयाबाहेरच रक्तदान शिबिर
तुकाराम बाबा महाराज यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, रूपेश पिसाळ, विवेक टेंगले, बाळासाहेब मोटे आदी उपस्थित होते.
शहरी व ग्रामीण भागात वीज बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. खरे तर विद्युत कायद्यानुसार वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी ग्राहकांना १५ दिवसांची पूर्वसूचना नोटीस देणे जरुरी आहे. ग्रामीण भागात वीज बिल वसुलीसाठी खासगी पथक पाचारण केल्याच्या तक्रारी येत आहेत. पूर्वसूचना दिल्याशिवाय वीज कनेक्शन तोडू नये. विद्युत मोटारीचे किमान वीज बिल भरून त्याचे टप्पे करण्यात यावेत. कोरोनाच्या महामारीत सर्व व्यवसाय बंद असल्याने मिनिमम चार्ज रद्द करावा व राहिलेले बिल टप्पे करून भरून घ्यावेत. असे न झाल्यास रक्तदान करून आंदोलन करण्याचा इशारा तुकारामबाबा महाराज यांनी दिला आहे.
030721\img_20210703_120254.jpg
महावितरणने मनमानी कारभार न थांबविल्यास कार्यालयाबाहेरच रक्तदान शिबिर