मिरजेत दोन महागड्या सायकलींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:17+5:302021-04-02T04:28:17+5:30
मिरज : मिरज येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून विक्रम बाबासाहेब वारे यांच्या ११ हजार रुपये किमतीच्या दोन ...

मिरजेत दोन महागड्या सायकलींची चोरी
मिरज : मिरज येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून विक्रम बाबासाहेब वारे यांच्या ११ हजार रुपये किमतीच्या दोन सायकली अज्ञातांनी लंपास केल्या. याबाबत वारे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
-------------
मिरज बस स्थानकात वृद्धास लुबाडले
मिरज : मिरजेतील शहरी बस स्थानकाजवळ अज्ञात चोरट्यांनी प्रमोद बापूजी कुलकर्णी (वय ७०, रा. मिरज) यांच्याकडून रोख १०० रुपये व ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. प्रमोद कुलकर्णी बुधवारी सकाळी बस स्थानकात गेले असताना, तिघा अज्ञातांनी त्यांचा मोबाईल व जेवणाचा डबा असलेली पिशवी व १०० रुपये रोख रक्कम काढून घेऊन पोबारा केला. याबाबत कुलकर्णी यांनी गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे.
-----------------
भोसे येथे दाम्पत्यास दगडाने मारहाण
मिरज : विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या पती-पत्नीस भोसे येथे दोघांनी दगडाने मारहाण केली . याबाबत मालन विठ्ठल कांबळे यांनी चुलत दीर मारुती वसंत कांबळे व दीपक मारुती कांबळे (दोघे रा. भोसे) यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. मालन कांबळे यांना चुलत दीर मारुती कांबळे हा विनाकारण शिवीगाळ करीत असल्याने मालन कांबळे व त्यांचे पती जाब विचारण्यासाठी गेले असता, दोघांनी दगडाने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.