धनगाव येथे ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST2021-03-16T04:28:31+5:302021-03-16T04:28:31+5:30
भिलवडी : धनगाव (ता. पलूस) येथून संजय बाळकृष्ण मांडवे (रा. भिलवडी) यांच्या मालकीचा ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी झाली आहे. ...

धनगाव येथे ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी
भिलवडी : धनगाव (ता. पलूस) येथून संजय बाळकृष्ण मांडवे (रा. भिलवडी) यांच्या मालकीचा ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी झाली आहे. याबाबत संजय मांडवे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संजय मांडवे हे सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास आपल्या ट्रॅक्टर (एमएच १० एस ५४४०) व ट्रॉलीने (क्र. एमएच १० बीझेड १०५७ व बीझेड १०९३) ऊस वाहतूक सुरू होती. रविवारी (दि. १४) वांगी येथील कारखान्यास ऊस पोहोचवून ट्रॅक्टरचालक विठ्ठल तुळशीराम सरगर (रा. धनगाव) येथे सायंकाळच्या सुमारास आला. त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या झेंडा चौकात रस्त्याकडेला ट्रॅक्टर व ट्रॉली लावून तो घरी गेला. सोमवारी (दि. १५ ) सकाळी ६ वाजता ट्रॉलीसह ट्रॅक्टर जागेवर नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने जवळपासच्या परिसरात ट्रॅक्टरची शोधाशोध केली; परंतु ट्रॅक्टर मिळून आला नाही. त्याने तात्काळ घटनेची माहिती ट्रॅक्टरमालक संजय मांडवे यांना दिली.