पेठ येथून तीन गाई आणि दुधाच्या मशीनची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:29 IST2021-04-28T04:29:40+5:302021-04-28T04:29:40+5:30

इस्लामपूर : पेठ-नायकलवाडी (ता.वाळवा) येथे शेतातील गोठ्यात बांधलेल्या ५० हजार रुपये किमतीच्या तीन बेंगलोरी जातीच्या गाई, दूध काढण्याची मशीन ...

Theft of three cows and a milk machine from Peth | पेठ येथून तीन गाई आणि दुधाच्या मशीनची चोरी

पेठ येथून तीन गाई आणि दुधाच्या मशीनची चोरी

इस्लामपूर : पेठ-नायकलवाडी (ता.वाळवा) येथे शेतातील गोठ्यात बांधलेल्या ५० हजार रुपये किमतीच्या तीन बेंगलोरी जातीच्या गाई, दूध काढण्याची मशीन आणि दुधाचा कॅन अशा २ लाख रुपये किमतीच्या ऐवजाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ही घटना रात्री ते पहाटेदरम्यान घडली. याबाबत गणेश अशोक जाधव (३२,पेठ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

नायकलवाडी गावच्या हद्दीतील न्हावकीच्या शेतात जाधव यांचा जनावरांचा गोठा आहे.सोमवारी सायंकाळी जाधव हे गाईच्या धारा काढून त्यांना वैरण-पाणी देऊन आले.रात्री १० वाजता पाऊस थांबल्याने भावाला घेऊन जाधव यांनी गोठ्यातील जनावरांची पाहणी केली, त्यावेळी सर्व जनावरे होती.

पहाटे ५.३० वाजता गणेश जाधव हे भावासह धारा काढण्यासाठी गेल्यावर त्यांना तीन गाई दिसून आल्या नाहीत. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. मात्र, गाई सापडल्या नाहीत. शेडमध्ये येऊन पाहिले असता, दूध काढण्याची मशीन आणि दुधाच्या कॅनचीही चोरी झाल्याचे दिसून आले. त्यावर जाधव यांनी पोलिसात धाव घेतली.

Web Title: Theft of three cows and a milk machine from Peth