सांगलीतून तीन दुचाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:25+5:302021-07-04T04:18:25+5:30
सांगली : शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी बुलेटसह तीन दुचाकी लंपास केल्या. याप्रकरणी सांगली शहर, विश्रामबाग व संजयनगर पोलिसांत फिर्याद ...

सांगलीतून तीन दुचाची चोरी
सांगली : शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी बुलेटसह तीन दुचाकी लंपास केल्या. याप्रकरणी सांगली शहर, विश्रामबाग व संजयनगर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सूरज यल्लाप्पा पवार (रा. वडर कॉलनी, सांगली) यांनी संजयनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार ३० जून रोजी अहिल्यादेवी होळकर चौकातील एका हॉटेळजवळून त्यांची बुलेट चोरट्यांनी लंपास केली.
दुसऱ्या घटनेत शासकीय रुग्णालयाच्या पार्किंगमधून २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी देवाप्पा सिंधू ठोंबरे (रा. उमळवाड, ता. शिराेळ) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. २९ जून रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
शहरातील हळद भवनसमोर रस्त्यावर लावलेली २० हजार रुपये किमतीची दुचाकीही चोरट्यांनी लंपास केली. प्रदीप जगन्नाथ मदने (रा. पद्माळे, ता. मिरज) यांनी शहर पाेलिसांत फिर्याद दिली आहे.