पुदेवाडी परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:55+5:302021-09-19T04:26:55+5:30

फोटो ओळी : पुदेवाडी (ता. शिराळा) येथे चंदन चोरट्यांनी तोडलेले चंदनाचे झाड. फोटो-१८वाटेगाव२ फोटो ओळ : पुदेवाडी (ता. शिराळा) ...

Theft of sandalwood trees in Pudewadi area | पुदेवाडी परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी

पुदेवाडी परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी

फोटो ओळी : पुदेवाडी (ता. शिराळा) येथे चंदन चोरट्यांनी तोडलेले चंदनाचे झाड.

फोटो-१८वाटेगाव२

फोटो ओळ : पुदेवाडी (ता. शिराळा) येथे गिर्रमिटच्या सहायाने चंदनाच्या बुंध्याला होल पाडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाटेगाव : बांबवडे (ता. शिराळा) येथील पुदेवाडी परिसरात चंदन चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चंदनाच्या मोठ्या झाडांची दिवसा टेहळणी करून रात्री डल्ला मारला जात आहे.

पुदेवाडी परिसरातील डोंगरात पक्ष्यांच्या विष्ठेतून चंदनाच्या झाडांची उगवण झाली आहे. सध्या सोन्याच्या किमतीबरोबर चंदनाच्या झाडांची किंमत वाढली असल्याने चंदनाच्या तस्करी केली जात आहे. मोठ्या झाडांना गिर्रमिटच्या सहायाने झाडांच्या बुंध्याला होल पाडून झाडाची कत्तल करून झाडे गायब केली जात आहेत.

मागील काही वर्षांपूर्वी या परिसरात कासेगाव पोलिसांनी चंदन चोरट्यावर कारवाई केल्याने चोरांवर धाक बसवला होता; पण काही महिन्यांपासून चंदन चोरट्यांनी पुदेवाडी परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

पोलीस व वनविभागाच्या दुर्लक्षामुळे चंदन तस्करी फोफावली आहे. पोलीस व वनविभागाने चंदन तस्कऱ्यांचा पर्दाफाश करावा, अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: Theft of sandalwood trees in Pudewadi area