शिराळा येथे २९ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:25 IST2021-09-13T04:25:13+5:302021-09-13T04:25:13+5:30

शिराळा : येथील कासार गल्लीतील गणेश दिलीप क्षीरसागर यांच्या घरातून चोरट्याने रोख २० हजार रुपये व नऊ हजार ...

Theft of Rs 29,000 at Shirala | शिराळा येथे २९ हजारांची चोरी

शिराळा येथे २९ हजारांची चोरी

शिराळा : येथील कासार गल्लीतील गणेश दिलीप क्षीरसागर यांच्या घरातून चोरट्याने रोख २० हजार रुपये व नऊ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना शनिवारी सकाळी ६.३० ते ७.३० च्या दरम्यान घडली. शिराळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

गणेश क्षीरसागर हे शनिवारी सकाळी आईसोबत शेतात जनावरांचे दूध काढण्यासाठी गेले होते. या वेळी चोरट्यांनी घराचे दार उघडे पाहून आत प्रवेश केला. घरातील २० हजार रुपये व नऊ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मरला. याबाबत गणेश क्षीरसागर यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवलदार दीपक खोमणे हे करीत आहेत.

Web Title: Theft of Rs 29,000 at Shirala