सांगलीत १८ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:05+5:302021-06-26T04:19:05+5:30

सांगली : शहरातील कोल्हापूर राेडवर असलेल्या फळ मार्केटसमोर बंद घराचा कडीकोयंडा तोडून १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ...

Theft of Rs 18,000 in Sangli | सांगलीत १८ हजारांची चोरी

सांगलीत १८ हजारांची चोरी

सांगली : शहरातील कोल्हापूर राेडवर असलेल्या फळ मार्केटसमोर बंद घराचा कडीकोयंडा तोडून १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सविता सदाशिव गडकरी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, गॅस टाकी असा मु्द्देमाल लंपास केला.

--------

जत, इस्लामपूरला अवैध दारु विक्रीवर कारवाई

सांगली : परवानगी नसताना दारुची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. सांगली ग्रामीण पोलिसांनी १५ बाटल्या व रोख ८०० रुपये जप्त केले तर इस्लामपूर पोलिसांनी १० दारुच्या बाटल्या जप्त केल्या. जत पोलिसांनी देशी दारुच्या १९ बाटल्या जप्त करत संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

------------

शिराळा तालुक्यात जुगारावर कारवाई

सांगली : जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरु ठेवली आहे. त्यानुसार शिराळा पोलिसांनी कारवाई करत रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करत संशयितावर जुगार कायदा अधिनियमानुसार कारवाई केली.

Web Title: Theft of Rs 18,000 in Sangli