गोदाम फोडून मोटारपंपची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:13+5:302021-07-07T04:33:13+5:30
सांगलीत दुचाकीची चोरी सांगली : येथील मराठा समाज कार्यालयासमोरील पार्किंगमधून चोरट्याने दुचाकी लंपास केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या ...

गोदाम फोडून मोटारपंपची चोरी
सांगलीत दुचाकीची चोरी
सांगली : येथील मराठा समाज कार्यालयासमोरील पार्किंगमधून चोरट्याने दुचाकी लंपास केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. याबाबत रहिमतुल्ला खादीरसाब पिंजारी (वय ३९, रा. यशवंतनगर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
---------
चोरट्याने मोबाईल लांबविला
सांगली : घरात चार्जिंगला लावलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना सोमवारी घडली. या प्रकरणी तुषार बाबासाहेब भोसले (वय २९, रा. बसस्थानकाजवळ) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
----------
गावभागात ७० हजारांचे दागिने लंपास
सांगली : गावभागातील एकाला दक्षिणा चांगलीच महागात पडली. दक्षिणा देण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ७० हजारांचे दागिने लांबविले. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
या प्रकरणी गजानन पंढरीनाथ कुलकर्णी (वय ५६, रा. हरिदास भवन) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी दोन अनोळखी व्यक्ती कुलकर्णी यांच्याकडे दक्षिणा देण्याच्या बहाण्याने घरात आल्या. घरातील ७० हजारांचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला.
--------------