इस्लामपूर बसस्थानकातून तब्बल अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:26+5:302021-01-13T05:09:26+5:30

इस्लामपूर : संक्रांतीसाठी आईला शिराळा येथे घेऊन जाण्यासाठी आलेल्या ३० वर्षीय विवाहित मुलीच्या पर्समधील दोन लाख ५० हजार रुपये ...

Theft of jewelery worth Rs 2.5 lakh from Islampur bus stand | इस्लामपूर बसस्थानकातून तब्बल अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

इस्लामपूर बसस्थानकातून तब्बल अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

इस्लामपूर : संक्रांतीसाठी आईला शिराळा येथे घेऊन जाण्यासाठी आलेल्या ३० वर्षीय विवाहित मुलीच्या पर्समधील दोन लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना सोमवारी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत वर्षा आनंदराव तांबीरे-पाटील (वय ३०, रा. शिराळा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

वर्षा या आपल्या आईला संक्रांत सणासाठी शिराळा येथे घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. दुपारी ३.१५ वाजता त्या तिरंगा चौकातून बसस्थानकात आल्या. तब्बल दीड तासानंतर शिराळाकडे जाणारी बस लागली. यावेळी प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्या गर्दीतून चढत असताना वर्षा यांच्या गळ्यात दागिने ठेवलेली पर्स होती, तर दोन्ही हातात पिशव्या होत्या. यावेळी गर्दीत त्यांच्या पर्सला कोणीतरी हिसका मारत होते. त्यांच्याकपाठीमागे त्यांची मुले होती. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पर्समध्ये ठेवलेल्या आईच्या दागिन्यांचा बॉक्स नाही हे जाणवले. त्यांनी पर्स तपासून पाहिली असता दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये गंठण, लक्ष्मीहार, राणीहार, नेकलेस अशा दागिन्यांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: Theft of jewelery worth Rs 2.5 lakh from Islampur bus stand