शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगरला दिवसाढवळ्या सराफी दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 10:26 IST

Crimenews Sangli-माधवनगर ( ता. मिरज) येथे मोटारसायकलीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सागर ज्वेलर्समधून १५ तोळ्याचे सोने आणि चांदीचे दागिन्याची बॅग लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघुनाथ साळुखे (रा. घनश्याम नगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देमाधवनगरला दिवसाढवळ्या सराफी दुकानात चोरी १५ तोळे दागिन्याची बॅग पळविली : मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांचे कृत्य

सांगली : माधवनगर ( ता. मिरज) येथे मोटारसायकलीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सागर ज्वेलर्समधून १५ तोळ्याचेसोने आणि चांदीचे दागिन्याची बॅग लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघुनाथ साळुखे (रा. घनश्याम नगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवनगरमध्ये दत्ताजी साळुंखे यांचे सागर ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे साळुंखे यांनी सराफी दुकान उघडले. त्यांनी घरातून १५ तोळ्याच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्याची बॅग दुकानांतील काऊंटरच्या आतील बाजूस ठेवली.

ते दुकानात साफसफाई करत होते. याचवेळी दोन तरुण मोटारसायकलीवरुन त्यांच्या दुकानात आले. चोरट्यांनी त्यांना तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले आहेत, असे सांगितले. त्यामुळे साळुंखे ते पडलेले पैसे घेण्यासाठी दुकानाच्या बाहेर गेले. तितक्यात दोघा चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश करुन आतील बाजूस ठेवलेली सोने आणि चांदीच्या दागिन्याची पिशवी घेतली आणि मोटारसायकलीवरून पळून गेले.

ते तरुण पळून का गेले, हे साळुखे पहात असताना त्यांना त्यांच्या दागिन्याची पिशवी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ संजयनगर पोलिसांना माहिती दिली. संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक उमेश चिकणे आणि त्यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिस