गॅस एजन्सीमध्ये चोरी; दीड लाख पळविले

By Admin | Updated: June 8, 2014 00:43 IST2014-06-08T00:42:31+5:302014-06-08T00:43:19+5:30

शटर तोडले : उगार खुर्दमधील प्रकार

Theft in a gas agency; Half of a million pirated | गॅस एजन्सीमध्ये चोरी; दीड लाख पळविले

गॅस एजन्सीमध्ये चोरी; दीड लाख पळविले

शिरगुप्पी : उगार खुर्द येथील एका गॅस एजन्सीचे शटर तोडून १ लाख ३८ हजार रुपये रोकड व अन्य एका घरातील सहा तोळ्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
उगार येथे रेणुका गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. शुक्रवारी कंपनीचे कामगार कार्यालयाकडे आले असता, त्यांना कार्यालयाचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरट्यांनी कार्यालयातील तिजोरी फोडून एक लाख अडतीस हजाराची रोकड लंपास केल्याचे लक्षात आले. ताबडतोब त्यांनी कागवाड पोलिसात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
यावेळी बेळगाव येथील ठसे तज्ज्ञांना व श्वानपथकाला पाचारण केले. ठसे तज्ज्ञांनी तिजोरीमधील सर्व कागदपत्रांवरील ठशाचे नमुने तपासणीसाठी घेतले. यावेळी श्वानदेखील स्टेशन रोडपर्यंत जाऊन परत आल्यामुळे कोणताही धागादोरा सापडला नाही.
तर त्याच रात्री येथील मोहन वैदू यांच्या घरातील सहा तोळ्याचे गंठण व मनगटी घड्याळ लंपास केल्याचेही शुक्रवारी उघडकीस आले. घरातील सर्वजण झोपल्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून डल्ला मारला. या दोन्ही घटनांची नोंद कागवाड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या दोन्ही घटना बरोबरच बोरगाव, बस्तवाड, निपाणी येथील मंदिरामध्ये चोरीच्या घटना घडल्या. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत कागवाड पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Theft in a gas agency; Half of a million pirated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.