आरवाडे पार्कमध्ये चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:10 IST2020-12-05T05:10:36+5:302020-12-05T05:10:36+5:30

-- वडर काॅलनीत मोटारसायकल चोरी सांगली : वडर काॅलनीत घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने लांबविली. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली ...

Theft in Arwade Park | आरवाडे पार्कमध्ये चोरी

आरवाडे पार्कमध्ये चोरी

--

वडर काॅलनीत मोटारसायकल चोरी

सांगली : वडर काॅलनीत घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने लांबविली. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली आहे. याप्रकरणी अनिल सुरेश वडर (वय ३०) याने गुरुवारी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.

------

तिजोरी फोडून रोकड लांबविली

सांगली : घरातील तिजोरीचे कुलूप तोडून ३२ हजार रुपयांची रोकड चोरल्याची घटना बुधगाव येथे २९ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी संजय आप्पासाहेब पाटील यांनी भावजय सुजाता विजय पाटील यांच्याविरूद्ध चोरीची फिर्याद दिली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.

-----------

डोक्यात वीट घातल्याने जखमी

सांगली : पती-पत्नीच्या भांडणाचा त्रास होऊ लागल्याने यातील पतीच्या डोक्यात शेजाऱ्याने वीट घातल्याचा प्रकार संजय गांधी झोपडपट्टीत घडला. यात अनिल सदाशिव माने (वय ५८) हे जखमी झाले. याप्रकरणी अस्लम शेख याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Theft in Arwade Park