कुपवाडात एमआयडीसीमध्ये दीड लाखाच्या ऑईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:26 AM2021-03-06T04:26:45+5:302021-03-06T04:26:45+5:30

ओळ : कुपवाड एमआयडीसीतील ऑईल चोरीतील संशयितांना सहायक निरीक्षक नीरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या पथकाने अटक केली. लोकमत ...

Theft of 1.5 lakh oil in MIDC in Kupwara | कुपवाडात एमआयडीसीमध्ये दीड लाखाच्या ऑईलची चोरी

कुपवाडात एमआयडीसीमध्ये दीड लाखाच्या ऑईलची चोरी

Next

ओळ : कुपवाड एमआयडीसीतील ऑईल चोरीतील संशयितांना सहायक निरीक्षक नीरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या पथकाने अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील नवकार डिस्ट्रिब्युटर्समधून पाच संशयित चोरट्यांनी इंजिन ऑईल मटेरियलची चोरी केल्याची घटना घडली. याबाबत उद्योजक दीपक घोडावत यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यानुसार कुपवाड पोलिसांनी तात्काळ पोलीस पथके रवाना करून अवघ्या १२ तासांत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १ लाख ३६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशियतांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सतीश आप्पासाहेब बंडगर (वय २७), संतोष दत्ता शिंदे (३१), सागर कल्लाप्पा वारे (२८), अभिजित कल्लाप्पा वारे (२७), गणेश पांडुरंग बनसोडे (३०, सर्व रा. शरदनगर, कुपवाड) यांचा समावेश आहे. कुपवाड औद्योगिक वसाहतीत दीपक जयचंद घोडावत (वय ४०, रा. रॉयल ग्रीन सोसायटी, माधवनगर रोड, सांगली) यांचे नवकार डिस्ट्रिब्युटर्स नावाची फर्म आहे. या फर्ममधून २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत पाच चोरट्यांनी फर्मच्या मागील बाजूस असलेल्या दाराकडील पत्रा उचकटून आत प्रवेश करून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या मिल्सी टर्बो टेक १५ डब्ल्यू ४० सीएल ४ चे साडेसात लिटरचे प्रत्येकी २५४० रुपये किमतीचे एकूण ५० हजार ८०० रुपयांचे २० बकेट चोरुन नेले.

उद्योजक दीपक घोडावत यांनी कुपवाड पोलिसांना चोरीची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पोलीस पथके रवाना केली. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत चोरीचा छडा लावून पाच चोरट्यांना गजाआड केले. त्यांच्याकडून १ लाख ३६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये साडेसात लिटरचे २० ऑईल बकेट, १ लिटरच्या २२० बाटल्या व साडेतीन लिटरच्या १२ बाटल्या असा मुद्देमाल आहे. सहायक निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, हवालदार युवराज पाटील, सतीश माने, शिवाजी जाधव, सचिन पाटील, नामदेव कमलाकर, इंद्रजित चेळकर आदींच्या पथकाने तपास केला. अटक केलेल्या पाचही संशयितांंना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. हवालदार शिवानंद गव्हाणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Theft of 1.5 lakh oil in MIDC in Kupwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.