शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक पाऊल पुढे, विधवेच्या पुनर्विवाहासाठी संसारसाहित्य देणार; सांगलीतील 'या' ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:35 IST

विधवा प्रथेविरोधात फक्त ठराव केला म्हणजे, समाजाची जबाबदारी संपत नाही. तिच्या पुनर्वसनाचा, पुनर्विवाहाचाही विचार व्हायला हवा.

सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) ग्रामपंचायतीने विधवा प्रथेविरोधात ठराव करताना एक पाऊल पुढे टाकले आहे. एखादी विधवा पुनर्विवाहासाठी तयार असेल, तर तिला लग्न लावून देण्यात येणार आहे. संसारोपयोगी साहित्याची मदतही दिली जाणार आहे.ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत तसा निर्णय झाला. ग्रामसेवक आर. डी. शिंदे यांनी विधवा प्रथेविषयी शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे वाचन केले. गावात विधवा प्रथा सुरु ठेऊ नये असे आवाहन केले. सरपंच अश्विनी कोळी यांच्यासह सदस्यांनी त्याला एकमुखी पाठींबा देत ठराव संमत केला. पण त्यापुढेही एक पाऊल टाकत विधवेच्या पुनर्वसनाची जबाबदारीही स्वीकारण्याचा निर्णय घेतला.उपसरपंच अनिता  पाटील यांनी तसा ठराव मांडला. सरपंच अश्विनी कोळी व उपसरपंच अनिता पाटील यांनी सांगितले की, विधवा प्रथेविरोधात फक्त ठराव केला म्हणजे, समाजाची जबाबदारी संपत नाही. तिच्या पुनर्वसनाचा, पुनर्विवाहाचाही विचार व्हायला हवा. त्याला उत्तेजन देण्यासाठी सक्रिय सहभाग घेणार आहोत.संबंधित विधवा महिला पुनर्विवाहासाठी तयार असेल, तर सर्व जबाबदारी ग्रामपंचायत स्वीकारेल. संसारोपयोगी साहित्य देऊन नवा संसार उभा केला जाईल. यानिमित्ताने ग्रामपंचायत व समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे, ही जाणीव विधवेच्या मनात निर्माण होईल, तिचा जगण्याचा आत्मविश्वास वाढेल. या मदतीसाठी महिला व बालकल्याण विभागाचा निधी वापरता येईल असा सूरही बैठकीत व्यक्त झाला. बैठकीला सदस्य सुहास पाटील, महावीर पाटील, अमोल कोळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नgram panchayatग्राम पंचायत