शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकाचा अडला शासन निधी, हिंदकेसरींना न्याय मिळणार कधी?; ग्रामस्थांतून नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 17:39 IST

हिंदकेसरी मारुती माने यांचे कार्यकर्तृत्व भावी पिढ्यांना कळावे, म्हणून शासनाने स्मारक मंजूर केले. भूमिपूजनानंतरही सात वर्षे काम रखडले

सचिन ढोलेसमडोळी : देशातच नव्हे, तर परदेशातही ताकद व कुस्तीकौशल्याच्या जोरावर ‘कुस्तीतला महाबली’ म्हणून बिरुदावली मिळालेल्या हिंदकेसरी मारुती माने यांचे कार्यकर्तृत्व भावी पिढ्यांना कळावे, म्हणून शासनाने स्मारक मंजूर केले. सात वर्षांपूर्वी भूमिपूजन झाल्यानंतरही निधीच्या रडगाण्यामुळे कवठेपिरान (ता.मिरज) येथील स्मारक अद्याप पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे कुस्तीला खऱ्या अर्थाने न्याय देणाऱ्या हिंदकेसरींच्या स्मारकास न्याय मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मारुती माने यांचे २०१० मध्ये निधन झाले. त्यानंतर, कवठेपिरानमध्ये गंजीखाना भागातील जागेत शासनाने स्मारक मंजूर केले. तत्कालीन मंत्री जयंत पाटील, पतंगराव कदम, आर.आर. पाटील आदींसह जुन्या काळातील मल्ल, कुस्तीप्रेमींच्या साक्षीने २०१६ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. या कामासाठी तीन कोटी चाळीस लाख निधी वापरला असला, तरी पुतळा, फर्निचर, ग्रंथालय, बहुउद्देशीय हॉल, प्रकाश झोतातील गॅलरी आदी कामे निधीअभावी रखडली आहेत.स्मारक व पुतळा समिती स्थापन करण्यात आली. कालांतराने यातील अनेक दिग्गज नेत्यांचे निधन झाले. त्यानंतर, समिती अस्तित्वात राहण्यासाठीही प्रयत्न झाले नाहीत. पुतळा उभारणीचे काम पुण्यातील संस्थेला दिले आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे. आता तरी राज्य शासन व पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून हिंदकेसरींना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

उर्वरित निधी गेला कुठे?स्मारक कामासाठी ४ कोटी ९४ लाखांचा निधी मंजूर झाला, पण प्रत्यक्षात तीन कोटी चाळीस लाखांचे काम झाले आहे. उर्वरित रक्कम कोणत्या कामासाठी वापरली, हे कळू शकले नाही. शासनाने कामासाठी सुधारित अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

स्मारकाच्या कामासाठी समिती गठीत करण्याविषयी संबंधितांना सुचविले होते, पण त्यावर कार्यवाही नाही. स्मारकासाठी निधी आवश्यक नसल्याचा अभिप्राय जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिला आहे. काही जणांकडून दिशाभूल केली जात असून, कामात खोडा घालण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना भेटून भावना मांडणार आहोत. ते निश्चितपणे न्याय देतील. - पै.भीमराव माने, माजी सरपंच.

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्ती