शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’ कोरडी पडल्याच्या निषेधार्थ उद्या सांगलीत मोर्चा, पाणीटंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

By अशोक डोंबाळे | Updated: October 26, 2023 16:05 IST

शेतकरी, सामाजिक संघटनांकडून मुख्यमंत्र्यांकडेही लेखी तक्रारी

सांगली : कोयना धरणात ८४.०६ टीएमसी पाणीसाठा असतानाही ऑक्टोबर महिन्यातच कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे कृष्णा नदी कोरडी पडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शुक्रवारी, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. काही सामाजिक संघटनांनीही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणीटंचाईची लेखी तक्रार केली आहे.आमदार अरुण लाड म्हणाले की, कृष्णा नदी कोरडी पडली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे इरिगेशन फेडरेशनमार्फत पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला; पण त्यांनी पालकमंत्र्यांशी बोलावे लागेल, असे सांगितले. त्यावर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला; पण अद्याप कसलाही कार्यवाही झाली नाही.शेवटी कोयना धरण प्रशासनाशी पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. त्यांनी सातारा येथील पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी बोलण्यास सांगितले. त्यानुसार शंभुराजे देसाई यांच्याशी संपर्क केला. त्यांनी कालवा समितीच्या बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय होईल, असे उत्तर दिले. शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असताना मंत्री बेजबाबदारपणे उत्तरे देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच शुक्रवारी, दि. २७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहे.

आमदारही रस्त्यावर उतरणारशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील हे पाणीटंचाईच्या प्रश्नावर शुक्रवारी शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होणार आहेत. कृष्णा नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी, पाणीपुरवठा संस्थांचे सभासदही मोर्चात सहभागी होणार आहेत.

स्वतंत्र भारत पक्षाचीही तक्रारस्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी कृष्णा नदी कोरडी पडल्याचे छायाचित्रासह निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मनोज भिसे यांनीही पाणीटंचाईची तक्रार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी