शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांना दिलासा; ‘कृष्णे’ची पाणीपातळी सात फुटांनी उतरली, रस्ते होणार रिकामे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:01 IST

पुराचे पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे

सांगली : जिल्ह्यासह धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे ‘कोयना’ आणि ‘वारणा’ दोन्ही धरणांतून शुक्रवारी विसर्ग बंद केला आहे. यामुळे कृष्णा नदीची दिवसात सात फुटाने पाणीपातळी कमी होऊन रात्री ३६.६ फूट झाली होती. शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत ३० फुटापर्यंत पाणीपातळी कमी होईल, असा पाटबंधारे विभागाने अंदाज वर्तविला आहे. बहुतांशी रस्ते, पुलांवरील पाणीपातळी कमी होऊन वाहतूक सुरळीत सुरू होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणात ९८.८९ टीएमसी म्हणजेच ९३.९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे कोयना धरणाचे शुक्रवारी सायंकाळी सर्व दरवाजे बंद करून पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत. त्याद्वारे दोन हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पाऊस आणि धरणातून विसर्ग थांबल्यामुळे कृष्णा नदीचीसांगली आयर्विन पूल येथे रात्री सात फुटाने उतरून ३६.६ फूट झाली होती.शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत ३२ ते ३० फुटापर्यंत पाणीपातळी कमी होणार आहे. पाणीपातळी कमी होऊ लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. सांगली शहरातील कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलांसह ताकारी, बहे पुलाची पाणीपातळी कमी झाली. सांगली, मिरज शहरातील नदीकाठच्या काही उपनगरांत पाणी शिरले होते. तेथील पाणीही कमी झाल्यामुळे नागरिकांकडून घरातील स्वच्छता सुरू केली आहे. या मार्गावरील अमणापूर, भिलवडी, ताकारी पुलांवरील वाहतूक सायंकाळपासून सुरळीत सुरू झाली आहे.वारणा धरणाचे गुरुवारी सायंकाळीच दरवाजे बंद केले आहेत. वक्र दरवाजे बंद करून विद्युत गृहातून एक हजार ६३० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला आहे. वारणा नदीची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. यामुळे वारणा नदीवरील पूल, बंधारे शनिवारी रिकामे होतील, असा प्रशासनाचा दावा आहे. पुराचे पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळी (फूट इंचामध्ये)

  • कृष्णा पूल कराड - २२
  • बहे पूल - ८.१०
  • ताकारी पूल - ३५.५
  • भिलवडी पूल - ३८.६
  • सांगली आयर्विन - ३६.६
  • राजापूर बंधारा - ४२.५

रस्ते मोकळे होण्यास सुरुवातकृष्णा, वारणेवरील पाण्याखाली गेलेले पूल, रस्ते सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारपर्यंत पाण्यात होते. सायंकाळनंतर वारणा नदीचे पाणी कमी झाल्यामुळे शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे-मांगले, वारणा नदीवरील चरण-कोडोली, आरळा-शित्तर, बिळाशी-भेडसगाव, कांदे-सावर्डे या पूल, बंधाऱ्यावरील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव-नांद्रे, घोगाव-दुधोंडी, आमणापूर, भिलवडी हे पूल रिकामे झाल्यामुळे वाहतूक सुरू झाली आहे.

धरणातील पाणीसाठाधरण पाणीसाठा (टीएमसी)/ टक्के

  • कोयना - ९८.८९ - ९३.९६
  • वारणा - ३१.६२ - ९२
  • धोम - १३.१८ - ९८
  • कण्हेर - ९.६८ - ९६
  • उरमोडी - ९.८२ - ९८ 

तालुकानिहाय चोवीस तासांतील पाऊसतालुका - पाऊस मिलिमीटरमध्ये

  • मिरज - १.२
  • जत - ०.२
  • खानापूर - १
  • वाळवा - १.५
  • तासगाव - १
  • शिराळा - ७.७
  • आटपाडी - ०.५
  • क.महांकाळ - ३.५
  • पलूस - १
  • कडेगाव - १.१