शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सांगलीत वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव, वाचकांशी ऋणानुबंध दृढ करणारा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:19 IST

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, व्यापार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय आदी क्षेत्रांतील मान्यवरांची स्नेहमेळाव्यास हजेरी

सांगली : विद्युत रोषणाईचा साज, फुलांची सुंदर आरास, रंगांच्या विविध छटांनी साकारलेली रांगोळी, सनईच्या मंगलमयी सुरावटींच्या सोबतीने सांगलीत गुरुवारी ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचा चोविसावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला.

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, व्यापार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी स्नेहमेळाव्यास हजेरी लावून शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, वृत्तसंपादक श्रीनिवास नागे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.सांगलीत माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिशनच्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी स्नेहमेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी हास्यकलाकार अजित कोष्टी, नगरसेवक पांडुरंग कोरे, भाजपचे अनुसूचित जमाती माेर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनखंडे उपस्थित होते.स्नेहमेळाव्यास खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक, माजी आमदार नितीन शिंदे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, महापालिका आयुक्त सुनील पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, एसटी महामंडळाचे तंत्र अभियंता अरुण वाघाटे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी, दयानंद मलपे, नगरसेवक प्रशांत पाटील, मयुर पाटील, तौफिक शिकलगार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, किरण सूर्यवंशी, अजित दोरकर, प्रा. पद्माकर जगदाळे, शेखर माने, ॲड. अमित शिंदे, शंभोराज काटकर, सागर घोडके, दिगंबर जाधव, डॉ. संजय पाटील, उद्योजक उज्ज्वल साठे, डॉ. नथानिअल ससे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहरलाल सारडा, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, बाळासाहेब होनमोरे, रंगावलीकार आदमअली मुजावर, इतिहास संशोधक सदानंद कदम, सदाशिव मगदूम, शिवाजी त्रिमुखे, डॉ. महेशकुमार कांबळे, शरद सातपुते, डॉ. यशवंत तोरो, धनेश शेटे, किरण मोरे, महेशकुमार चौगुले, संपत कदम, कृष्णात पाटोळे, प्रा. नारायण उंटवाले. प्रा राजपूत, सांगली ग्रामीण पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सांगली शहर पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.

‘लोकमत’च्या ‘सांगली ट्रेंडस्’ विशेषांकाचे थाटात प्रकाशन‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘सांगली ट्रेंडस्’ विशेषांकाचे गुरुवारी थाटात प्रकाशन करण्यात आले.माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित स्नेहमेळाव्यात प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, माजी नगरसेवक राजेश नाईक, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, वृत्तसंपादक श्रीनिवास नागे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस उपस्थित होते.वर्धापन दिनानिमित्त ‘सांगली ट्रेंडस्’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. जिल्ह्याने परंपरा आणि नावीन्याची सांगड घालत नानाविध क्षेत्रांतील बदल स्वीकारले. सृजनशीलता आणि सर्जनशीलता सांभाळत गतिमान होताना प्रयोगशीलतेला चालना दिली. या बदलांवर प्रकाशझोत टाकणारा हा विशेषांक वाचकांना गुरुवारी देण्यात आला. गुरुवारी त्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. विविध क्षेत्रांतील वाचकांनी विशेषांकाचे कौतुक केले. स्नेहमेळाव्यात वर्धापन दिनानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.गणपती मंदिरात कार्यक्रमसांगलीच्या पंचायतन गणपती मंदिरात गुरुवारी सकाळी ‘लोकमत’च्या विशेषांकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे जाहिरात उपव्यवस्थापक विनायक पाटील, सहायक वितरण व्यवस्थापक रवींद्र बिरंजे, इस्लामपूरचे विभागीय प्रतिनिधी अशोक पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीLokmatलोकमत