शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

Sangli: म्हैसाळ भ्रूण हत्याप्रकरणी यंत्रणेची चौकशी करावी, राज्यपालांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 14:51 IST

जिल्ह्यातील प्रश्नांची यादी उद्धवसेनेकडून सादर

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील ३९ स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. मात्र, या प्रकरणात पोलिस व आरोग्य यंत्रणेने उदासीनता दाखविली. हा तपास थांबविला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली.राज्यपालांना दिलेल्या पत्रात उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांनी म्हटले आहे की, सात वर्षांपूर्वी म्हैसाळ येथे एका डॉक्टरने ३९ गर्भपात केल्याचे उघडकीस आले होते. अनेक स्त्रीभ्रूण हत्या त्यांनी केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी थांबवला. या प्रकरणामध्ये महिला विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची प्रक्रिया गृहमंत्रालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या खटल्यातसुद्धा संबंधित डॉक्टरला शिक्षा होऊ शकली नाही.सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये शासनाकडून आलेल्या विकास निधीचा खर्च अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाल्याने शासनाचे अब्जावधी रुपये वाया गेले आहेत. हा निधी विकासकामाच्या नावाखाली खर्च न होता अवैध मार्गाने एका रॅकेटच्या खिशात गेला आहे. याची चौकशी करावी.सांगलीतील दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्मारक गेली तीस वर्षे रखडले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, पांडू मास्तर, नागनाथ अण्णा नायकवडी, हिंदकेसरी मारुती माने, आधुनिक महाकवी ग. दि. माडगूळकर, दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील अशा अनेकांची स्मारके रखडली आहेत.

समान पाणीवाटपाचे धोरण हवेसांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे या योजना जवळपास पूर्ण झाल्या आहेत. मात्र, सर्वांना समान पद्धतीने पाणी वाटप होण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाऊन नंतर ते सर्वांत पहिल्या गावापर्यंत यावे. यासाठी नियोजनाची गरज आहे, अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली.

राज्यपालांकडून प्रश्नांची नोंदराज्यपालांनी निवेदन स्वीकारत या प्रश्नांची नोंद घेऊन ते सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले. उद्धवसेनेच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Sangliसांगली