शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका निवडणुकीत 'रिक्षावाल्यां'चे चिन्हही 'ऑटो रिक्षा'च, अनोख्या योगायोगाची रंगतदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:06 IST

प्रचारातही रिक्षाच केंद्रस्थानी

प्रसाद माळीसांगली : काही दिवसांपूर्वी गाजलेले ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ हे गीत आता थेट राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. निमित्त ठरली आहे सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक! या निवडणुकीच्या रिंगणात दोन रिक्षाचालक अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना ‘ऑटोरिक्षा’ हेच चिन्ह दिल्याने सध्या शहरभर या अनोख्या योगायोगाची रंगतदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता ‘मताची वाट बघतोय रिक्षावाला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोप, प्रचारफेऱ्या, आश्वासनांची रेलचेल याबरोबरच काही गमतीदार, लक्षवेधी आणि वेगळ्या घटना घडतात. महापालिका निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. याच निवडणुकीतून एक आगळावेगळा, कुतूहल वाढवणारा प्रसंग समोर आला आहे. प्रभाग क्रमांक ३ ‘ड’ आणि प्रभाग क्रमांक ८ ‘ड’ येथून दोन रिक्षाचालकांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करताना या दोघांनीही चिन्हांच्या पसंतीत पहिल्या क्रमांकावर ‘ऑटोरिक्षा’ हेच चिन्ह मागितले होते. एकाने रिक्षा, कप-बशी आणि शिट्टी, तर दुसऱ्याने रिक्षा, कप-बशी आणि बॅट अशा क्रमाने पसंती नोंदवली होती. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी दोघांनाही त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार ‘ऑटोरिक्षा’ हे चिन्ह बहाल केले. त्यामुळे आता त्यांच्या प्रचारातही रिक्षाच केंद्रस्थानी आली आहे.रिक्षाच बनली प्रचारमाध्यमनिवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार आपला प्रचार वेगळ्या पद्धतीने कसा उठून दिसेल, यासाठी नवनव्या शक्कल लढवतात. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. मात्र, या दोन उमेदवारांच्या बाबतीत त्यांचा व्यवसायच त्यांचा प्रचार ठरतो आहे. अनेक वर्षांपासून शहरात ‘रिक्षावाला’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या उमेदवारांना आता वेगळे चिन्ह रुजविण्याची कसरत करावी लागणार नाही. कारण रिक्षा हीच त्यांची ओळख, रिक्षाच त्यांची ओळखपत्र आणि रिक्षाच त्यांचा प्रचारमाध्यम बनली आहे.

आठ अपक्ष उमेदवारांना ‘ऑटोरिक्षा’ चिन्हमहापालिका निवडणुकीदरम्यान निवडणूक कार्यालयाकडून २० प्रभागांतील एकूण ८ अपक्ष उमेदवारांना ‘ऑटोरिक्षा’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यामध्ये दोन उमेदवार प्रत्यक्ष रिक्षाचालक असून उर्वरित सहा अपक्ष उमेदवारांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत. प्रभाग क्रमांक ३ ‘ड’, ४ ‘क’, ५ ‘क’, ७ ‘ब’, ८ ‘ड’, १६ ‘ड’, १८ ‘ब’ आणि १९ ‘ब’ या प्रभागांतील अपक्ष उमेदवारांना ऑटोरिक्षा हे चिन्ह मिळाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election: Auto-rickshaw symbol for 'rickshaw drivers' sparks interesting coincidence.

Web Summary : Sangli witnesses a unique coincidence as two auto-rickshaw drivers contesting independently receive the 'auto-rickshaw' symbol. This has sparked lively discussions, turning their profession into a prominent campaign tool. Eight independent candidates received this symbol.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६