शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘कैसे सुकून पाऊँ, तुझे देखने के बाद’; सांगलीत गझलांच्या चांदण्यात उजळली रात अजीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:56 IST

नव्याच्या पौर्णिमेला तेजाळला सुरश्री महोत्सव, रसिकांचे सूरस्नान

सांगली : नव्याच्या पौर्णिमेचा आकाशी तेजाळलेला चंद्र...त्याच्या शीतल प्रकाशात बहरलेली रात्र अन् या चांदणरातीला सांगलीच्या भूमीवर बहरलेली सूरपुष्पांची मैफल रसिकांच्या हृदयाला उजळवून गेली. सुंदर गझलांचे तलत (प्रकटणे) अन् अजीज (प्रिय) असणाऱ्या सदाबहार गझलांचा प्रवाह अनुभवत सांगलीकरांनी रविवारी सूरस्नान केले.सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रंगलेल्या दोन दिवसांच्या सुरश्री महोत्सवाची सांगता रविवारी रात्री लोकप्रिय गझल गायक, संगीतकार तलत अजीज यांच्या स्वरवर्षावात झाली. ‘कैसे सुकून पाऊँ, तुझे देखने के बाद’ या गझलने त्यांनी मैफलीची सुरुवात करीत रसिकांना गुणगुणायला लावले. रसिकांची उपस्थितीत अन् गझलांना, वाद्यवादकांना मिळणारी दाद पाहून त्यांनी असे रसिक नशीबवान असलेल्या कलाकारांनाच मिळतात, असा प्रतिसाद दिला.‘जिंदगी जब भी तेरी बझ्म में लाती है हमें, ये जमी चाँद से बेहतर नजर आती है हमें’ या शहरयार यांच्या ‘उमराव जान’मधील गझलेतून त्यांनी आकाशातील चंद्रमापेक्षा सांगलीच्या भूमीवरील ही मैफल सुंदर असल्याचे स्पष्ट केले. तल्लीन झालेले रसिक पाहून त्यांनी अलगदपणे ‘आज जाने की जिद ना करो’ ही या वातावरणाशी साजेशी गझल पेश करीत रसिकांना जणू आवाहनच केले.‘बाजार’ चित्रपटातील ‘फिर छिडी रात बात फुलों की, रात है या बारात फुलों की’ या गाजलेल्या गझलेतून रंगलेल्या महोत्सवात बहर फुलविला. मेहंदी हसन यांच्या ‘रंजिश ही सही दिल दुखाने के लिये आ’ तसेच शबीना अदीब यांच्या ‘खामोश लब है झुकी है पलकें’ या गझलांनी त्यांनी मने जिंकली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी नंतर ‘तुमको देखा तो ये खयाल आया’, ‘होंठों से छूलो तुम’, या गझला पेश केल्या. फिल्म ‘डॅडी’मधील ‘आईना मुझ से मेरी पहली सी सूरत माँगे’ या सुंदर गझलने त्यांनी मैफलीची सांगता केली.तबल्यावर जितू शंकर जी, व्हायोलिनवर इकबाल वारसी, बासरीवर भास्कर दास आणि की बोर्ड वर शाहिद अजमेरा यांनी अतिशय सुंदर आणि समर्पक साथ केली.

खूप दिवसांनी अशी रसिकता अनुभवलीतलत अजीज यांनी सांगलीकरांच्या रसिकतेला दाद दिली. ‘खूप वर्षांनंतर असे दाद देणारे व समरस होणारे रसिक पाहिले. अशी मैफल व रसिक लाभणे हा नशिबाचा भाग असतो. त्यामुळे मी नशीबवान समजतो. आयुष्याच्या शेवटपर्यंत सांगलीचा हा महोत्सव घर करून राहील.’ अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Talat Aziz's Ghazal Night: Sangli Drenched in Melodious Moonlight.

Web Summary : Sangli resonated with Talat Aziz's ghazals at the Surshree Mahotsav. Aziz captivated the audience with classics like 'Aaj Jaane Ki Zid Na Karo,' and 'Honton Se Chulo Tum.' He praised Sangli's enthusiastic audience, calling the experience unforgettable.