शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेतील ५२ वर्षांपूर्वीचा शिवरायांचा पुतळा आजही भक्कम, लोकवर्गणीतून केली होती उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:26 IST

मिरज : मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यातच कोसळला. मिरजेत मंगळवार पेठेत ५२ ...

मिरज : मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यातच कोसळला. मिरजेत मंगळवार पेठेत ५२ वर्षांपूर्वी लाेकवर्गणीतून उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आजही भक्कम स्थितीत उभा आहे.दि. १५ मे १९७२ रोजी या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मिरजेतील शिल्पकार दादा ओतारी यांनी ब्रान्झ धातूपासून हा पुतळा तयार केला आहे. १९०० किलो वजनाच्या या पुतळ्यासाठी त्यावेळी एकोणसाठ हजार रुपये खर्च आला होता. पुतळा तयार करताना मिरजेतील सामान्य नागरिकांनी हातभार लावला. छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ समितीच्या त्या वेळेच्या कार्यकर्त्यांच्या कष्टातून हा पुतळा उभारला. ताराचंद शहा यांच्या प्रेरणेने शिवतीर्थ समितीचे पदाधिकारी नारायण भोंगळे, विश्वनाथ भिसे, विठ्ठलराव माळवदे, वसंत गवंडी, दत्तात्रय रानभरे यांनी पुतळा उभा करण्यासाठी परिश्रम घेतले. छत्रपतींचे एक सुंदर स्मारक गेली ५२ वर्षे भक्कम उभे आहे.मिरजेत हा पुतळा उभारल्यानंतर दिवंगत शिवभक्त पांडुरंग अवसरे नित्य पूजा करीत असत. त्यांच्या पश्चात आजही गेली ५२ वर्षे शिवरायांची नित्यपूजा सुरू आहे. शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष सुधीर अवसरे व सहकाऱ्यांकडून नित्य पूजा करण्यात येते. मालवण येथील घटनेचा मिरजेत समस्त शिवप्रेमींनी तीव्र निषेध केला.

आजही अभेदय.. चित्रपतस्वी भालजी पेंढारकर यांची देखरेख व त्यावेळी प्रसिध्द मूर्तीकार दादा ओतारी यांची हस्तकला यातून मिरजेत साकारलेला पुतळा अभेदय आहे.  १९७२ साली कात्री गल्ली'असे नावं असलेल्या मंगळवार पेठेतील  शरद अवसरे यांनी सध्याच्या शिवाजी चौकात गल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी मोहीम सुरु केली. सांगलीचे भाई ताराचंद शहा यांनी शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा  उभारण्यासाठी पुढाकार घेतला. नारायण बोंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक समिती स्थापन झाली. शरद अवसरे, भाई ताराचंद शहा, नारायण बोंगाळे, विश्वनाथ पिसे, विठल माळवदे, वसंत गवंडी यांनी निधी संकलन केले. 

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज