शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकर, लॉजिस्टिक पार्क विसरा..; राज्याच्या धोरणात बेदखल

By संतोष भिसे | Updated: August 10, 2024 15:39 IST

नेत्यांची आश्वासने ठरली 'बोलाचा भात अन् बोलाची कढी'

संतोष भिसेसांगली : महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी, तसेच आगामी १० वर्षांत विकासाला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने राज्याच्या लॉजिस्टिक धोरणाला मंजुरी दिली. बुधवारच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले; पण या धोरणात सांगलीच्या लॉजिस्टिक पार्कचा उल्लेखदेखील नाही. गेली दोन-तीन वर्षे सांगलीच्या लॉजिस्टिक पार्कबद्दल नेतेमंडळींनी केलेल्या घोषणा म्हणजे निवडणुकीचा फंडाच ठरला आहे.राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी मंत्रिमंडळाने पनवेलमध्ये राष्ट्रीय लॉजिस्टिक हब, नागपूर-वर्धा, छत्रपती संभाजीनगर- जालना, ठाणे-भिवंडी, रत्नागिरी-सिंधदुर्ग, पालघर-वाढवण येथे राज्य लॉजिस्टिक हब विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-देगलूर, अमरावती-बडनेरा, कोल्हापूर-इचलकरंजी, नाशिक-सिन्नर व धुळे-शिरपूर या पाच प्रादेशिक लॉजिस्टिक हबनाही मंजुरी दिली आहे. या संपूर्ण आराखड्यात सांगलीचा समावेश कोठेच नाही.रांजणीला ड्रायपोर्ट होणार म्हणून सांगलीच्या राजकारण्यांनी सांगलीकरांना वर्षानुवर्षे झुलवत ठेवले. ड्रायपोर्ट ॲथॉरिटीने तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जाहीर केल्यानंतर ड्रायपोर्टचा भ्रमाचा भोपळा फुटला. त्यानंतर सलगरे येथे लॉजिस्टिक पार्कच्या गप्पा सुरू करण्यात आल्या; पण राज्याच्या धोरणात त्याचा उल्लेख नसल्याने हादेखील नेत्यांनी अंधारात मारलेला बाण ठरला आहे. लोकसभा निवडणुकीआधी लॉजिस्टिक पार्कचा मोठा धुरळा उडाला; पण त्यात कोणतेही तथ्य नसून नेत्यांनी सांगलीकरांची फसवणूक केल्याचेच एव्हाना स्पष्ट झाले आहे.

जिल्हा लॉजिस्टिक नोड्स तरी करा!

  • राज्याच्या लॉजिस्टिक धोरणात जिल्हानिहाय लॉजिस्टिक नोड्सचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. २५ जिल्हा लॉजिस्टिक नोड्स करण्याचे शासनाचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन ते तीन ठिकाणी १०० एकर क्षेत्रावर त्याचे नियोजन आहे.
  • जिल्ह्याची दोन-तीन प्रमुख उद्योग-व्यापार व व्यवसायाची ठिकाणे हब आणि स्पोक मॉडेलअंतर्गत जोडली जाणार आहेत. एमआयडीसी क्षेत्रातील १५ टक्के क्षेत्र खासगी लॉजिस्टिक नोड्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. नेत्यांनी आता या जिल्हा लॉजिस्टिक नोड्ससाठी तरी ताकद लावावी अशा सांगलीकरांच्या अपेक्षा आहेत.

महामार्ग झाले, लॉजिस्टिक कधी?

  • रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गामुळे जिल्ह्यातील महत्त्वाची शहरे, व्यापार, उद्योग क्षेत्रे जवळ आली आहेत.
  • प्रस्तावित पुणे-बंगळुरू हरित महामार्गही प्राथमिक अवस्थेत आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे यांचे जाळे असताना लॉजिस्टिक पार्कचा विचार का होत नाही? हा सांगलीकरांचा प्रश्न आहे.

इच्छाशक्तीचा तुटवडाजिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत पार्कसाठी अगदी ५०० एकरपर्यंत जागा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आदी मूलभूत बाबी उपलब्ध आहेत. राजकारण्यांच्या इच्छाशक्तीचा मात्र तुटवडा आहे.

टॅग्स :Sangliसांगली