शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'राष्ट्रपती निवडणुकीनंतर ठाकरे सरकार बरखास्त होईल, पंतप्रधान मोदी घेतील निर्णय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:26 IST

२०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांचे मावळे कावळे होऊन उडून गेले असतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष होऊन स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल.

सांगली : राज्यसभेनंतर लवकरच विधान परिषद निवडणुकीत आणखी एक धक्का महाविकास आघाडीला दिला जाईल. राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने रविवारी भावे नाट्यमंदिरात कार्यकर्ता मेळावा पार पडला. मेळाव्यास खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, माजी आमदार नितीन शिंदे, भगवानराव साळुंखे, विलासराव जगताप, नीता केळकर, शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.'हाळवणकर म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे न बोलता कार्यक्रम करण्यात पटाईत आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कार्यक्रम पक्का होता. केवळ मुख्यमंत्रिपदासाठीच जनादेश डावलून तीन पक्ष एकत्र आले आहेत. ठाकरेंनी दगाबाजी केली आहे. त्याचा फटका त्यांना राज्यसभा निवडणुकीत दिला आहे. येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक झाल्यावर राज्यातील सरकार मोदी बरखास्त करतील.ते म्हणाले, येणारा काळ भाजपचा आहे. त्याची सुरुवात राज्यसभेच्या विजयापासून झालेली आहे. २०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांचे मावळे कावळे होऊन उडून गेले असतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष होऊन स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल.

खासदार संजयकाका पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेला चमत्कार शरद पवारांनीही मान्य केला. महाविकास आघाडीकड़े बहुमत असताना त्यांचा उमेदवार पडला हा त्यांचा नैतिक पराभव आहे. आ. गाडगीळ म्हणाले, पक्षात कोणी लहान-मोठे नाही. आपण पक्षाचे देणे लागतो अशा पद्धतीने सर्वांनी येत्या काळात काम करावे.उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असा ठराव नीता केळकर यांनी मांडला. त्याला विलासराव जगताप आणि संजयकाका यांनी अनुमोदन दिले.

पैशापुढे चालत नाही!विलासराव जगताप यांनी कार्यक्रमात परखड मते मांडली. ते म्हणाले की, निवडणुका कशा होतात ते शास्त्र समजून घ्या. गाडी आहे पण त्यात इंधन नको का? पैशापुढे काही चालत नाही. नुसतं तत्त्वज्ञान सांगून काय उपयोग? त्यांच्या या मतावर अनेकांनी हसून दाद दिली.

खुर्च्या रिकाम्या... हा कसला भव्य मेळावा?हाळवणकर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून चिमटा काढला.. नाट्यगृहातील अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्या पाहून हाळवणकर म्हणाले, खुर्च्या रिकाम्या आहेत. हा कसला भव्य मेळावा?

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी