शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पहिला वीज दरवाढीची महावितरणची मागणी फेटाळली, नंतर स्वत:च्याच आदेशाला स्थगिती दिली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:27 IST

वीज नियामक आयोगाचा पराक्रम 

दिलीप मोहिते विटा (जि. सांगली) : राज्य वीज नियामक आयोगाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच वीज दरवाढीची महावितरणची मागणी फेटाळत वीज ग्राहकांना अंशत: दिलासा देणाऱ्या आयोगाने स्वत:च्याच आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे आधी वीज ग्राहकांना दिलासा व नंतर त्यांच्याच आदेशाला स्थगिती देत आयोगाने जुनेच वीज दर लागू राहतील, असा आदेश दिला. त्यामुळे राज्यातील सुमारे ३ कोटी वीज ग्राहकांत संतापाची प्रचंड लाट उसळली आहे.महावितरणने फेब्रुवारी महिन्यात सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी वीज दर निश्चितीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगासमोर मंजुरीसाठी दाखल केला होता. त्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष छुपी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली होती. यावर हजारो वीज ग्राहकांच्या लेखी हरकती व जाहीर सुनावणीमधील विरोध व सूचना विचारात घेऊन नियामक आयोगाने दि. १ एप्रिल २०२५ पासून लागू करावयाच्या दराबाबत दि. २८ मार्च रोजी निकाल जाहीर केला.त्यावेळी राज्यातील सुमारे ३ कोटी वीज ग्राहकांना पहिल्यांदाच दिलासा देत महावितरणला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून होत असलेली अतिरिक्त वीज गळती कमी करण्याचे व आपला कारभार सुधारण्याचे कठोर आदेश दिले होते. या निकालाचे राज्यातील आद्योगिक, व्यापारी तसेच घरगुती वीज ग्राहकांतून स्वागत झाले होते.मात्र, हे समाधान ग्राहकांसाठी क्षणिक ठरले. वीज नियामक आयोगाचे महावितरणच्या केवळ एका साध्या अर्जावर व घातलेल्या •िातीला घाबरून नियामक आयोगाने स्वत:च्याच आदेशाला स्थगिती देत एप्रिलपासून जुनेच वीज दर लागू राहतील, असा फतवा दि. २ एप्रिलला जारी केला. हा एकतर्फी आदेश जारी करताना राज्यातील तीन कोटी वीज ग्राहकांना विचारात घ्यायची तसदी नियामक आयोगाने घेतली नसल्याने ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीज नियामक आयोगाच्या या पराक्रमामुळे त्यांच्याच विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वीज नियामक आयोग व महावितरणने दुटप्पी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य शासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता राज्यातील तीन कोटी वीज ग्राहकांच्या भावना विचारात घेऊन महावितरणला खडे बोल सुनावत अर्ज मागे घ्यायला लावणे गरजेचे आहे. आमदार, खासदार यांनीही आता शासनाकडे पाठपुरावा करून आयोगाने दि. २८ मार्च रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू करणे भाग पाडावे. - किरण तारळेकर, सदस्य महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना, मुंबई.

टॅग्स :Sangliसांगलीelectricityवीजmahavitaranमहावितरण