शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विमानात आली चक्कर, रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या महिलेचे इस्लामपूरच्या सुपुत्राने वाचविले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:34 IST

हजारो फूट उंचीवर असतानाही रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ज्ञानाचा वापर करणाऱ्या इस्लामपूरच्या या सुपुत्राप्रति विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांनी उभे राहून कृतज्ञता व्यक्त केली.

युनूस शेखइस्लामपूर : लंडन येथे हृदयविकारामधील अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या डॉ. हर्षद प्रदीप शहा या इस्लामपूरच्या सुपुत्राने विमानात चक्कर येऊन पडल्यानंतर डोक्याला मार लागून रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या इंडो-अमेरिकन महिलेचे विमानामध्ये उपचार करत प्राण वाचवले.हर्षद शहा शहरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पी. टी. शहा आणि डॉ. नीलम शहा यांचे पुत्र आहेत. त्यांनी मुंबईत वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर लंडनच्या इंटरनॅशनल क्लिनिकल फेलोशीपसाठी हृदयविकारावरील अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी ते रविवारी रवाना झाले. विमान प्रवासादरम्यान त्यांनी एका महिलेचे प्राण वाचविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.मुंबईतून विमानाने उड्डाण केल्यानंतर एक महिला चक्कर येऊन पडली. डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत ती बेशुद्ध पडली होती. या घटनेमुळे हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी हवाई सुंदरींनी अत्यवस्थ महिलेला  मदत हवी आहे, त्यासाठी कोणी डॉक्टर आहेत का, अशी विचारणा केली. तेव्हा डॉ. हर्षद शहा यांनी त्वरेने जाऊन महिलेची तपासणी केली असता परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले.महिलेची हृदयगती आणि रक्तदाब क्षीण झाला होता. विमानातील सहप्रवासी असणाऱ्या दोन धाडसी महिला डॉक्टरांना सोबत घेत उपलब्ध साधनसामग्रीवर डॉ. हर्षद यांनी उपचार सुरू केले. यावेळी मुख्य वैमानिकांनी कॉकपीटच्या बाहेर येऊन ‘आपण सध्या तेहरानच्या हवाई हद्दीत आहोत, इथे उतरलो तर पुढचे दीड दिवस थांबावे लागेल, काय करूया,’ अशी विचारणा केली. त्यावर डॉ. हर्षद यांनी ‘केवळ १५ मिनिटे द्या, मग निर्णय घेऊ’, असे सांगून बिझनेस क्लासमधील बेडवर या महिला रुग्णावर उपचार सुरू केले.तिने उपचाराला प्रतिसाद दिल्यानंतर तिची शारीरिक परिस्थिती सुधारली. प्रसंगावधान राखत अत्यंत धाडसाने केलेल्या उपचारामुळे या महिलेस जीवदान मिळाले. हजारो फूट उंचीवर असतानाही रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ज्ञानाचा वापर करणाऱ्या इस्लामपूरच्या या सुपुत्राप्रति विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांनी उभे राहून कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टरairplaneविमान