शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळची नजर राजकीय भूकंपाकडे; सगरे भाजपच्या वाटेवर?, पाटील-घोरपडे गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:47 IST

रोहित पाटील यांची भूमिका निर्णायक

दत्ता पाटीलतासगाव : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे. विशेषत: माजी खासदार संजय पाटील आणि महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. बदलत्या राजकीय घडामोडीत आमदार रोहित पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची भूमिका देखील लक्षवेधी ठरणार आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी लवकरच आरक्षण जाहीर होणार आहे तत्पूर्वीच मतदारसंघातील प्रबळ नेत्यांनी वर्चस्वासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, यावेळी बहुतांश नेत्यांकडून नवा राजकीय भूकंप घडविण्यासाठी व रचना आखली जात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी झाल्याचे दिसून येणार आहे.

सगरे गटाची वाटचाल भाजपच्या दिशेने?अनिता सगरे अध्यक्ष असलेल्या महांकाली साखर कारखान्याचे घोंगडे अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे. या कारखान्याचे कोडे सोडविण्यासाठी सगळे गटाची वाटचाल भाजपच्या दिशेने असल्याची चर्चा सुरू आहे. कुंडल येथील शरद लाड यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सगळे गटाच्या प्रवेशाला बळ मिळाले आहे. सगरे गटाने राजकीय भूकंप घडवल्यास कवठेमहांकाळ तालुक्याचे राजकारण निर्णायक वळणावर येईल.

संजय काकांची भूमिका देणार पहिला धक्का तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा पहिला भूकंप माजी खासदार संजय पाटील यांच्या भूमिकेने बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बुधवारी (दि. ८) काका गटाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.रोहित पाटील यांची भूमिका निर्णायकराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांची मतदारसंघातील भूमिका निर्णायक राहणार आहे. सद्य:स्थितीत रोहित पाटील यांचे बहुतांश जिल्हा परिषद गटावर वर्चस्व आहे. हे वर्चस्व अबाधित राखताना, आमदार पाटील अन्य नेत्यांशी हात मिळवणी करतील का? यावरच अनेक समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

घोरपडे गट कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेल्या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय धक्का दिला. आता जिल्ह्यात पडद्याआड नव्या राजकीय समीकरणांची नांदी सुरू झाली आहे. घोरपडे समर्थकांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याशी सलगी दिसून येत आहे. त्यामुळे मिरज पूर्व भाग आणि कवठेमहांकाळ तालुक्यात घोरपडे गट कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli district politics eyes earthquake; Sagare towards BJP? Patil's role crucial.

Web Summary : Tasgaon-Kavathemahankal anticipates political shifts before local elections. Sagare group's potential BJP move and Sanjay Patil's upcoming meeting spark speculation. Rohit Patil's influence and Ghorpade's future actions are key factors.