शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: डोंगर खचले तरी वाड्या वस्त्यांचे पुनर्वसन होईना !, शिराळा तालुक्यात भूस्खलनाचा धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:12 IST

अतिवृष्टी झाली तर याठिकाणी मोठे नुकसान होण्याची शक्यता

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परीसरातील आरळापैकी, भाष्टेवस्ती, धामणकर वस्ती तसेच कोकणेवाडी, मिरुखेवाडी या वाड्या वस्त्यांचे अजूनही पुनर्वसन न झाल्याने दुर्घटनेचा धोका कायम आहे.माळीण, वायनाडसारख्या दुर्घटना होण्याअगोदर प्रशासनाने या डोंगराखालच्या वस्त्यांचे पुनवर्सन करणे गरजेचे आहे. शिराळा तालुक्यात वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून डोंगर खचले आहेत. अतिवृष्टी झाली तर याठिकाणी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शासनाकडून येथील नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर होणार का ? असा प्रश्न आहे. शिराळा पश्चिम भागातील अनेक वाड्या वस्त्यांवरही अशीच परिस्थिती आहे. पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका कायम आहे. याठिकाणी भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती त्यावेळी कोकनेवाडी येथील डोंगर केव्हाही ढासळू शकतो, असा निष्कर्ष काढला होता. याबाबत वरिष्ठ कार्यालयास ११ नोव्हेंबर २०१९ ला माहिती ही कळविली होती. या प्रश्नाबाबत वारंवार याबाबत बैठक झाल्या. स्थलांतरासाठी जागा पाहणी झाली याबाबत प्रस्ताव पाठवला. या नागरिकांना किती जागा देणार, कोणत्या सोयी- सुविधा द्यायच्या, अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता पुनर्वसन करण्यात येणाऱ्या जागांचे नागपूरच्या उपायुक्त दूर संवेदन उपयोजन केंद्राकडून जमिनीच्या पातळीबाबत नकाशा मागविला आहे. त्यामुळे हे पुनर्वसन यावर्षी तरी रेंगाळले आहे. २०१९ पासून पुनर्वसनाबाबत प्रश्न रेंगाळला आहे.या ठिकाणी आहे धोका?शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरुखेवाडी, कोकणेवाडी, भाष्टेवाडी, काळोखेवाडी, सावंतवाडी, भिसेवाडी या डोंगराच्या पायथ्याला तर जाधववाडी ढाणकेवाडी, सावंतवाडी, येसलेवाडी गुंडेवाडी या डोंगर पठारावर वसलेल्या वाड्यावस्त्या आहेत. जळकेवाडी, बेर्डेवाडी, खोतवाडी परिसरातही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी दरवर्षी तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दोन - तीन वर्षांपासून येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भूस्खलनाचे संकट आहे.

पुनर्वसन होणारी कुटुंबेकोकणेवाडी कुटुंब १०१, पुनर्वसन ठिकाण बेरडेवाडी, भाष्टेवस्ती -कुटुंब ३०, पुनर्वसन ठिकाण बेरडेवाडी, धामणकरवस्ती -कुटुंब २६, पुनर्वसन ठिकाण आरळा, मिरुखेवाडी - कुटंब १३१, पुनर्वसन ठिकाण मणदूर.

सहायक संचालक, नगर रचना, सांगली यांना नकाशे, कुटुंबाच्या यादी, नागरी सुविधा आदींची माहिती ३१ ऑक्टोबर २४ रोजी पाठवली आहे. आता जमीन पातळीचा नकाशा मागविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. सध्या पावसाचे प्रमाण वाढले, तर आवश्यकतेनुसार येथील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. याठिकाणी पूर्णवेळ शासकीय कर्मचारी नेमणूक केली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. - शामला खोत पाटील, तहसीलदार, शिराळा.