शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रच संकटग्रस्त, शासनाकडून निधीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 15:38 IST

तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने २००५-०६ च्या महापुरानंतर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राची उभारणी केली.

शीतल पाटीलसांगली : तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने २००५-०६ च्या महापुरानंतर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राची उभारणी केली. या केंद्राच्या माध्यमातून चार जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्याचा उद्देश ठेवण्यात आला. त्याची जबाबदारी सांगली महापालिकेवर टाकण्यात आली. मोठा गाजावाजा करून उभारलेले हे केंद्र आता निधीअभावी शेवटची घटका मोजत आहे.जुलै २००५ मध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी एक प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आले. या केंद्राचे मुख्यालय सांगली महापालिका निश्चित केले गेले, तर आयुक्त हे केंद्राचे प्रमुख असतील, असे शासनाने स्पष्ट केले.आता केंद्र उभारून १६ वर्षांचा काळ लोटला आहे. या केंद्राच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्याची घोषणा महापुराच्या पाण्याबरोबरच वाहून गेली आहे. हे केंद्र मृत्युशय्येवर असून महापालिकेच्या मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा फलकही गायब झाला आहे.केंद्राचा उद्देश

आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारताना शासनाने काही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवली होती. नागरी भागातील आपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्याबरोबरच जनतेत जागृती निर्माण करणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, मदत व बचाव कार्य पथके नियुक्त करणे आदी हेतू होता. पण हा उद्देशच नंतरच्या काळात हवेत विरला आहे.

केवळ एक कोटीचा निधी२००६ साली स्थापन करण्यात आलेल्या या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थान केंद्राला आठ ते नऊ वर्षे शासनाने निधीच दिला नाही. २०१५ मध्ये शासनाकडून एक कोटीचा निधी आला होता. त्यातून कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रत्येकी १० लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. उर्वरित निधीतून सांगली महापालिकेने दोन रेस्क्यू वाहने खरेदी केली. त्यानंतर आजअखेर एक पैसाही केंद्रांना मिळाला नाही. आता तर हे केंद्रच विस्मृतीत गेले आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या समस्या

सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत महापुराची समस्या गंभीर आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टी, वादळ, दरड कोसळणे या समस्या आहेत. वेगवेगळ्या समस्यांमुळे एकसमानता नसल्याने आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या कामात समन्वय राहू शकला नाही.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर