शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- शर्यतीत प्रथम आलेल्या म्हशीचा फोटो व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवला, रागातून तरुणावर चाकूहल्ला केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:04 IST

म्हशीला गुलाल लावल्याचा फोटो कसा ठेवायचा, तुला दाखवतो, असे म्हणत दमदाटी करुन चाकूहल्ला केला

मिरज : म्हशीच्या शर्यतीत प्रथम आलेल्या म्हशीचा गुलाल लावलेला फोटो व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवल्याच्या कारणावरून मिरजेत तरुणावर  चाकूहल्ला करून डोक्यात काचेची ट्यूब फोडण्यात आली. मंगळवार पेठेत जैन मंदिरजवळ ही घटना घडली.याप्रकरणी विजय आकाराम खिलारे (वय २२, रा. धनगर गल्ली, मिरज) यांनी शहर पोलिसांत  भूषण एडके, विश्वेश गवळी व अन्य दोन अनोळखी तरुण अशा चौघांविरुद्ध तक्रार दिली आहे. दि. २८ मार्च रोजी मिरजेत म्हशीच्या शर्यतीत विजय खिलारे यांच्या म्हशीने प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे खिलारे यांनी म्हशीला गुलाल लावून म्हशीसोबतचा स्वत:चा फोटो त्यांच्या व्हॉटस्ॲप स्टेटसवर ठेवला होता. याचा त्यांचे शर्यतीतील प्रतिस्पर्धी भूषण एडके व विश्वेश गवळी यांना राग आला.विजय खिलारे हे जैन मंदिराजवळ असलेल्या सागर शिरगुप्पे यांच्या डेअरीत दूध देण्यासाठी गेले असताना भूषण एडके व विश्वेश गवळी याच्यासह त्याचे दोघे साथीदार तेथे  आले. यावेळी भूषण याने खिलारे यांना, म्हशीला गुलाल लावल्याचा फोटो कसा ठेवायचा, तुला दाखवतो, असे म्हणत दमदाटी केली.  खिलारे यांना खाली पाडून पायावर व मांडीवर चाकूने वार करून जखमी केले.  विश्वेश गवळी याने सोबत आणलेली ट्यूबलाइट डोक्यात फोडली. अन्य दोघा साथीदारांनी प्लास्टिक खुर्चीने डोक्यात मारहाण केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी