शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील खरेदी-विक्रीदारांच्या संमेलनाचा पॅटर्न राज्यात राबविणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:45 IST

शिराळा : सांगली जिल्ह्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित केलेला खरेदी विक्री दारांची एकत्रित चर्चा भेट संमेलन या उपक्रमाची शासन स्तरावर ...

शिराळा : सांगली जिल्ह्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित केलेला खरेदी विक्री दारांची एकत्रित चर्चा भेट संमेलन या उपक्रमाची शासन स्तरावर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना थेट, विश्वासू खरेदीदार मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. संमेलनाचे यश पाहता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आप-आपल्या जिल्ह्यात “सांगली पॅटर्न”राबविण्याच्या सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात उत्पादित होणा-या कृषि उत्पादने, फळे, प्रक्रीया केलीली कृषि उत्पादने यांना हमखास व स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक शेतक-यांना नवीन बाजार पेठांचा लाभ घेता यावा व जिल्ह्यांचा आर्थिकस्तर वाढविण्याकरिता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मित्रा, मुंबई, कृषी विभाग व अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.सदर संमेलनात विविध प्रक्रीया उद्योजक, व्यापारी, निर्यातदार आणि मार्केटिंग कंपन्यांनी शेतक-यांशी थेट चर्चेव्दारे करार केले. एकुण १४.३९ कोटीचे व्यवहार ठरल्याने सांगली जिल्ह्यातील कृषि क्षेत्राला मोठा आर्थिक लाभ मिळाला. वरील संमेलनाचे यश पाहता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आप-आपल्या जिल्ह्यात आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांसह कृषी उत्पादनांच्या विपणनासाठी असे संमेलन आयोजित केल्यास राज्यातील कृषिक्षेत्राला व शेतक-यांचे अर्थकारणात सकारात्मक बदल होईल. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होईल व जिल्ह्यांचा आर्थिकस्तर वाढेल. त्यामुळे असे संमेलन आपल्याकडून कृषी उपजांच्या विपणनासाठी  आयोजन करुन त्यांच्या आर्थिक सामाजिक परीणामाच्या विवेचनासह अहवाल पाठवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.लोकाभिमुख दृष्टिकोनशेतकरी, खरेदीदार, प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ यांना एका व्यासपीठावर आणण्याचे यश सांगलीने मिळवले आहे. या उपक्रमामुळे पारदर्शक व्यवहार व परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपक्रमाच्या यशाची दखल घेत मा. मंत्री, पणन यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना “सांगली पॅटर्न” राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.कष्टकरी शेतकरी, संवेदनशील प्रशासन व एकमेकांना सहकार्य करण्याची भावना यांचे हे सामूहिक यश आहे. नवकल्पना व लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे सांगली जिल्ह्याचा आदर्श पुन्हा अधोरेखित झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli's farmer-buyer meet pattern to be implemented statewide: Minister Rawal

Web Summary : Inspired by Sangli's successful farmer-buyer meet, Maharashtra will implement the 'Sangli Pattern' statewide. This initiative aims to boost farmer income by connecting them directly with reliable buyers, fostering transparent deals and economic growth in agriculture.