शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

सांगलीतील बिसूरमध्ये पाटील कुटुंबाने १४३ वर्षे जुन्या पिंपर्णीला दिले जीवदान, जपल्या आजी-आजोबांच्या स्मृती

By संतोष भिसे | Updated: July 3, 2023 14:37 IST

गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या खटपटीला यश येऊ लागले

सांगली : बिसूर (ता. मिरज) येथे पाटील कुटुंबियांच्या आजी-आजोबांनी लावलेली पिंपर्णी वयोमानाने म्हातारी झाली. जर्जर अवस्थेत कशीबशी मुळे  रोवून होती. पण कालच्या उन्हाळ्यात जोरदार वाऱ्यावादळात तिचे पाय डळमळले. वृद्धत्वामुळे न झेपणारा डोलारा अखेर शांतपणे जमिनीवर टाकला. पाटील कु टुंबियांनी तिचे पुनर्रोपण करत पुन्हा जीवदान दिले.१४३ वर्षे पिंपर्णी ऊन-पावसाचे तडाखो सोसत हळूहळू धराशायी झाली. पण तिच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या पाटील कुटुंबियांना तिच्यामध्ये आजी-आजोबांचे अस्तित्व दिसत होते. पिंपर्णीने हार मानली, पण त्यांनी धीर सोडला नाही. मोठी यातायात करुन परत उभे केले. जमिनीत रुजवले. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या खटपटीला यश येऊ लागले. सध्या पिंपर्णी पुन्हा उभी राहू पाहत आहे. आकाशात झेपावू पाहत आहे.बिसूरमध्ये गावापासून किलोमीटरभर अंतरावर पाटील कुटुंबियाची शेती आहे. शेतात बांधावर त्यांच्या पूर्वजांनी सन १८८० मध्ये पिंपर्णीचे झाड लावले होते. तिच्या सोबतीनेच कुटुंबातील तीन-चार पिढ्याही मोठ्या झाल्या. १४३ वर्षे उन्हाळे-पावसाळे पाहिलेली पिंपर्णी हल्ली कमकुवत झाली होती. मे-जून महिन्यात जोरदार वाऱ्यात ती एका बाजुला कलली. मुळे जमिनीबाहेर आली. पाटील कुटुंबातील विश्वास पाटील यांनी तिला पुनर्जीवन देण्याचा निर्णय घेतला. नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे अमोल जाधव, प्रवीण शिंदे, अरविंद सोमण आदींनी मदत केली. त्याचा फायदा झाला. सध्या झाड  पुन्हा उभे राहिले असून तग धरु लागले आहे. कुटुंबियांच्या प्रेमाने काही दिवसांतच पुन्हा बहरेल. पुढील पिढ्यांना पर्यावरणाचा संदेश देत राहील.

फांद्या छाटून बोजा कमी केलाविश्वास पाटील यांनी वृक्षप्रेमी व पर्यावरण तज्ज्ञांशी सल्लामसलत केली. त्यांच्या सल्ल्याने पिंपर्णीचे पुनर्रोपण केले. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्चही केला. मुळे पुन्हा रुजण्यासाठी पुरेशी माती, रसायने वापरली. झाडाचा बोजा कमी करण्यासाठी एका बाजूच्या फांद्याही छाटल्या. त्यामुळे झाडाला जणू नवा आत्मविश्वास मिळाला आहे.

टॅग्स :Sangliसांगली