शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

सांगली जिल्ह्यात गेल्या २० वर्षांतील नीचांकी पेरणी, कडधान्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता

By अशोक डोंबाळे | Updated: July 5, 2023 11:53 IST

खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओस

सांगली : जिल्ह्यात आतापर्यंत किमान १३५.५ मिलिमीटरपर्यंत पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ५.५ टक्केच झाला आहे. परिणामी जिल्ह्यात खरीप पेरण्या गेल्या २० वर्षांतील नीचांकी म्हणजे केवळ ५.२६ टक्के झाल्या आहेत. खरीप पेरण्या लांबल्यामुळे कडधान्याचे पेरणी क्षेत्रही घटण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. यापैकी २८ जून २०२३ पर्यंत केवळ १३ हजार ४५८.५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५.२६ टक्केच पेरणी झाली आहे. गेल्या २० वर्षांतील खरीप पेरण्यांची आकडेवारी लक्षात घेतल्यास जवळपास ३५ ते ६० टक्केपर्यंत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होत होती, तसेच मान्सून पाऊसही १०० मिलिमीटरपर्यंत होत होता; परंतु यावर्षी जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यास सुरुवात झाली आहे.तरीही जिल्ह्यात ५.५ टक्केच पाऊस झाल्याची सांगली पाटबंधारे विभागाची माहिती आहे, तसेच केवळ ५.२६ टक्के खरीप हंगामाची पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पाऊस आणि खरीप पेरण्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. कडधान्याचे पेरणी क्षेत्रही जिल्ह्यात घटण्याची शक्यता असल्याचे कृषी तज्ज्ञांचा अहवाल आहे. धूळ वाफेवर झालेले भात पीकही अडचणीत आले आहे.जिल्ह्यात अशी झाली पेरणीतालुका - सरासरी क्षेत्र - पेरणी - टक्केवारीमिरज -२४६७१.१  - ३१३ - १.३जत - ७८२१० - ९८५.१ - १.४खानापूर - १६१०० - २०१.१ - ०.५६वाळवा - २३१२२ - ४५६ - २तासगाव - ३३१२२ - १५६ - ०.३४शिराळा - २२६०५ - १०७५० - ४५आटपाडी - १०७५० - १६३  - १.५क. महांकाळ - २१३७३.९ - १०६७.४ - ५पलूस - ६१०८ - ३०४ - ५कडेगाव - १९९१६ - ४२२ २. - ३४एकूण - २५५९८४ - १३४५८.५ - ५.२६वर्षनिहाय ३ जुलैपर्यंतची पेरणीवर्ष -   टक्केवारी२०२३    ५.२६२०२२     ३५२०२१      ३२२०२०      ४४२०१९      ५२शिराळ्यात १०१७० हेक्टरवर भाताची पेरणीशिराळा तालुक्यात भात पेरणीचे १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १० हजार १४२ हेक्टरवर भाताची पेरणी उरकली आहे. ७४.४६ टक्के भाताची पेरणी झाली असून पावसाअभावी भात पीकही संकटात सापडले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे.खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओसजिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होते; परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी बियाणे, खते खरेदीसाठीही पुढे आले नसल्याचे चित्र असल्यामुळे कृषी सेवा केंद्रे ओस पडली आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी