शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब पाटील महामंडळाची राज्यातील कर्जवाटप प्रक्रिया ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 18:14 IST

प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे हाल

सांगली : येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पोर्टल पूर्णपणे बंद असल्यामुळे राज्यातील लाभार्थ्यांची गैरसोय झाली आहे. अनेकांची कर्जप्रकरणे होत नसल्यामुळे त्यांचे व्यवसायाचे स्वप्नही भंगले आहे. शासनाने तातडीने पोर्टल सुरू करून लाभार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी मराठा समाजातील लाभार्थ्यांमधून होत आहे.मराठा छावणी सामाजिक संस्थेचे सचिव सर्जेराव पाटील यांनी म्हटले की, मराठा तरुणांच्या हाताला काम नसून भांडवल नाही. नोकरी मिळत नाही, म्हणून मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरू केले. सुरुवातीपासूनच ही योजना ऑनलाइन पद्धतीने राबवली गेली. ग्रामीण भागातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचावी या उद्देशाने ही योजना ऑनलाइन सुरू केली. परंतु, संगणक प्रणालीमध्ये बऱ्याच अडचणी असल्यामुळे लाभार्थ्यांना नाहक जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. महामंडळाचे पोर्टल (एम्प्लॉयमेंट) म्हणजे कमिशनर ऑफ स्किल डेव्हलपमेंट, रोजगार आणि उद्योजकता यांच्याशी संलग्न महामंडळ असल्याने सध्या रोजगार एम्प्लॉयमेंटवर लाभार्थ्यांनी स्टायफड नोंदणी सुरू आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पोर्टल बंद अवस्थेत असून बरेच लोक प्रयत्न करूनही सुरू होत नाही. यामुळे लाभार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. सध्या लाभार्थ्यांना बँका कर्ज देत नाहीत. मराठा समाजाच्या ५८ मोर्चानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ सुरू झाल्याने थोड्याफार प्रमाणात युवकांच्यात उत्साह दिसून आला. परंतु सहा वर्षात राज्यातील ९५ हजार प्रकरणे करून घोर निराशा समाजातील तरुणांच्या पदरी पडली आहे. यामध्ये ट्रॅक्टरची राज्यातील ३० हजार कर्ज प्रकरणे आहेत. बऱ्याच बँकांनी स्टार्टअपला सुरुवातीला कमी कर्ज घ्या. प्रोजेक्टपेक्षा कमी कर्ज मंजूर केले आहे. हे कर्ज एकदाच असल्यामुळे त्यामध्ये पुन्हा अर्ज करता येत नाही. त्यामुळे कमी कर्जामध्ये व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे.

दहा दिवसात पोर्टल सुरळीत होईल : अनिल पाटीलअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, महामंडळाचे पोर्टल बंद असल्याबद्दल माहिती संकेतस्थळावर दिली आहे. पोर्टल अपडेट करण्याचे काम सुरू आहे. येत्या दहा दिवसात पोर्टल सुरळीत सुरू होईल.

टॅग्स :SangliसांगलीAnnasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ