शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवू, दुष्काळी फोरमच्या नेत्यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:12 IST

बाहेरचा उमेदवार चालणार नाही, जतमधील बैठकीत रणनीतीवर चर्चा

जत : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या दुष्काळी फोरममधील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीतही ताकद दाखवण्याचा इशारा दिला आहे. यासाठी फोरममधील काही नेत्यांची बैठक जत येथे विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी जगताप यांच्यासह पृथ्वीराज देशमुख व अजितराव घोरपडे उपस्थित होते.जिल्ह्यातील विविध पक्षांतील नेत्यांनी दुष्काळी फोरम नावाने एक स्वतंत्र गट स्थापन केला आहे. पूर्वी या गटाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद मिळाली होती. मात्र, या गटातील जवळपास सर्वच नेते गेल्या काही वर्षांत भाजप, शिवसेनेत गेले. त्यानंतर हा फोरम शांत होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या फोरमने आपली ताकद दाखविली.भाजपमध्ये असलेले या फोरमधील नेते पक्षाबद्दल काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी नाराजी तत्कालीन खासदार संजय पाटील यांच्या कार्यपद्धतीवर होती. पृथ्वीराज देशमुख व जगताप यांनी पक्षाकडे अनेक तक्रारी केल्या. पक्षाच्या बैठकीत जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवली; पण या नेत्यांच्या नाराजीची भाजपने दखल घेतली नाही. त्यांचा विरोध डावलून संजय पाटील यांना उमेदवारी दिली गेली. त्यानंतर या नेत्यांनी उघडपणे पक्षाविरोधात जाऊन अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. परिणामी, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला.विरोधात काम करूनही भाजपने दुष्काळी फोरममधील या नेत्यांवर कारवाई केली नाही.विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी भाजप सावध पावले टाकत असतानाच आता या फोरममधील विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख व अजितराव घोरपडे यांची बैठक पार पडली. आता विधानसभा निवडणुकीतही तीच भूमिका कायम ठेवण्यावर या बैठकीत नेत्यांची चर्चा झाली.

बाहेरचा उमेदवार चालणार नाहीजत मतदारसंघात बाहेरच्या उमेदवारांची लुडबुड चालली असून, त्यास थोपविण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. भाजपच्या कार्यपद्धतीत बदल न झाल्यास विधानसभेला पुन्हा ताकद दाखवण्याचे या बैठकीत ठरले. जत मतदारसंघात वेगळा विचार करून स्वतंत्र आघाडीची स्थापना करून स्थानिक उमेदवारास संधी देण्याबाबतही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024droughtदुष्काळ